Home राजकीय माजी अग्निवीरांना शासकीय सेवेत संधी देण्याच्या निर्णय स्वागतार्ह !

माजी अग्निवीरांना शासकीय सेवेत संधी देण्याच्या निर्णय स्वागतार्ह !

4 second read
0
0
5

no images were found

माजी अग्निवीरांना शासकीय सेवेत संधी देण्याच्या निर्णय स्वागतार्ह ! मुख्यमंत्री फडणवीस व महायुती सरकारचे हेमंत पाटील यांनी मानले आभार 

पुणे,: सैन्यदलात चार वर्षे देशसेवा करणाऱ्या माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाच्या गट-क मधील गणवेशधारी सेवांमध्ये १० टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतल्याबद्दल भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

या निर्णयामुळे सैन्यदलातील शिस्त, प्रशिक्षण, नेतृत्वगुण, तांत्रिक कौशल्य आणि देशसेवेचा अनुभव असलेल्या तरुणांना पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, कारागृह, अग्निशमन, गृहरक्षक दल, राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग आणि महानगरपालिकांमधील विविध गणवेशधारी पदांवर संधी मिळेल.माजी अग्निवीरांना संबंधित भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेतून सूट देण्यासह वयोमर्यादा व इतर बाबींमध्ये सवलतींची तरतूद करण्यात येणार असल्याचे देखील पाटील म्हणाले.

देशासाठी चार वर्षे सेवा करणाऱ्या जवानांच्या कौशल्याचा उपयोग राज्याच्या सुरक्षेसाठी आणि प्रशासनासाठी करून घेणे ही स्वागतार्ह बाब आहे. या निर्णयामुळे अग्निवीरांच्या भविष्यातील रोजगाराची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारनेही CAPF व Assam Rifles मधील कॉन्स्टेबल/रायफलमन पदांसाठी माजी अग्निवीरांना ५० टक्के आरक्षण, वयोमर्यादेत सवलत तसेच PST, PET आणि लेखी परीक्षेतून सूट देण्याची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या तुकडीतील २,४९६ अग्निवीर महाराष्ट्रातील असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

अग्निवीरांच्या भवितव्याचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे पाटील यांनी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी कोल्हापूर,: पारंपरिक व देशी खेळांना जागति…