no images were found
मनसेतर्फे छत्रपती महाराणी ताराराणी पुतळ्याचे पूजन
कोल्हापूर : मनसे कोल्हापूर तर्फे करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचे पुण्यतिथीनिमित्य संपर्क अध्यक्ष जयराजदादा लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांचे शुभहस्ते ताराराणी चौक येथील छत्रपती महाराणी ताराराणी पुतळ्याचे पूजन व अभिवादन करणेत केले.
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी छत्रपती ताराराणींच्या इतिहासाचा आम्हांला अभिमान असून त्यांच्या विचारांचे वारसदार आम्ही असून अखंडितपणे हा वारसा जोपसण्यासाठी कठीबद्ध असल्याच्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण जगामध्ये छत्रपती ताराराणी ह्या एकमेवाद्वितीय महाराणी असल्याचे गौरवोदगार ब्रिटिश संस्थांनाच्या अधिकाऱ्यांनी काढल्याने त्यांची कीर्ती विश्वात पसरलेली असल्याच्याही अभिमान असल्याचे नमूद केले. तसेच पुतळ्याभोवतीची दुरावस्था पाहून व्याकुळ वेदनेने परिसराच्या सुशोभीकरणाचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी छत्रपती ताराराणींचा इतिहास विषद व्यक्त करताना जागतिक पातळीवरील छत्रपती ताराराणी ही एकमेव महिला महाराणी होत्या ज्यांनी सलग ७ वर्षे औरंगजेबाशी प्राणपणाने लढून त्याला मातीत गाडण्याची शिल्पकार असून करवीर संस्थांनाची संस्थापना करणाऱ्या ताराराणीचा दैदीप्यमान इतिहास मनसे कोल्हापूर तर्फे जपण्याचे अभिवचन दिले.
याप्रसंगी ताराराणीच्या पुतळ्याचे पूजन करून, राजमुद्रेतील नामफलकाला पुष्पहार अर्पण करून ताराराणीच्या जय जयकराच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, परिवहन जिल्हा अध्यक्ष विजय करजगार , जिल्हा उपाध्यक्ष निलेश धूम्मा , निलेश लाड , दिलीप पाटील , निलेश आजगांवकर , रणजित वरेकर , चंद्रकांत सुगते , राहुल पाटील , सुरज कानूगडे , संग्राम सावंत , गणेश सांगवडेकर , संजय पाटील इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.