
no images were found
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने 2024 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी उद्योगासंबंधातील दावा सेटलमेंट प्रमाण योग्य राखले आहे
कोल्हापुर / रत्नागिरी – जीवन विमा हा आर्थिक नियोजनाचा एक आवश्यक घटक आहे, जो कुटुंबाला तसेच कर्त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करतो. पॉलिसीधारकाचे अकाली निधन झाल्यास कुटुंबाची आर्थिक सुरक्षा अबाधित राखण्यासाठी कंपनीने दिलेले हे वचन आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जाण्यामुळे होणार आर्थिक त्रास दूर करण्यासाठी हे एक साधन आहे.विम्याचा दावा करणे, ही व्यवसायासाठी महत्त्वाची घटना असते. त्यामुळे विश्वास असलेल्या ब्रँडकडूनच पॉलिसी खरेदी केली पाहिजे. क्लेम सेटलमेंट रेशो आणि क्लेम सेटल करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ याबाबत विचार करणे, हे ग्राहक-अनुकूल जीवन विमा कंपनीचे चांगले निदर्शक असते. क्लेम सेटल होण्यासाठी लागणारा टर्नअराउंड वेळ देखील महत्त्वाचा असतो, कारण लाभार्थ्यांना हक्काची रक्कम लवकर प्राप्त होणे गरजेचे असते.
उल्लेखनीय म्हणजे, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सकडे सातत्यपूर्ण क्लेम सेटलमेंट रेशोचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, यात आर्थिक वर्ष 2024 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यांसाठी क्लेम सेटलमेंट रेशो 98.6% आहे.क्लेम सेटलमेंट रेशोमध्ये सातत्य महत्त्वाचे आहे. कारण आपण नसताना आपल्या कुटुंबाची आर्थिक कारणांमुळे हेळसांड होणार नाही, याचा विश्वास ते पॉलिसीधारकाला देतात.आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचा क्यू1- आर्थिक वर्ष 2024 मध्ये क्लेम सेटलमेंट रेशो 98.10%, क्यू2- आर्थिक वर्ष 2024 98.14% आणि क्यू3- आर्थिक वर्ष 2024 मध्ये हे प्रमाण 98.52% होते. विशेष म्हणजे, सर्व संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर तपास न केलेल्या दाव्यांसाठी सरासरी सेटलमेंट टर्नअराउंड वेळ हा केवळ 1.3 दिवस होता. ही आकडेवारी डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांसाठीची आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफमध्ये एक ‘क्लेम फॉर शुअर’ सेवा देखील आहे. यात सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर एका दिवसात सर्व पात्र मृत्यू दावे निकाली काढले जातात. या उपक्रमांतर्गत दाव्यावर प्रक्रिया करण्यास विलंब झाल्यास, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ लाभार्थ्याला दाव्याच्या रकमेवर जमा झालेल्या व्याजासह भरपाई देते. याशिवाय, ग्राहकांची सोय म्हणून दावे दाखल करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी व्हाट्सअँप, मोबाइल ॲप आणि वेबसाइट सारख्या डिजिटल टचपॉईंटला सक्षम करण्याशिवाय, दाव्याशी संबंधित कागदपत्रे घरून स्वीकारण्याची देखील तयारी दर्शवते.या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफने ‘क्लेम फॉर शुअर’ अंतर्गत 214.70 कोटी रुपयांचे 3,070 दावे निकाली काढले. तसेच यातील बहुसंख्य दावे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निकाली काढले जातात ज्यामुळे लाभार्थ्यांना दाव्याची रक्कम तात्काळ उपलब्ध होऊ शकते.