
no images were found
राज्यात दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी
राज्यातील दोन जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी सापडल्यामुळे राज्याच्या खनिजसंपत्तीत मोठी भर पडली आहे. प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी) आढळल्या आहेत. मागे यासंबंधीचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता.
राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. आमच्या सरकारच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल; तसेच राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.