Home Video किकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ED मार्फत चौकशी करा – राजवर्धन नाईक निंबाळकर

किकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ED मार्फत चौकशी करा – राजवर्धन नाईक निंबाळकर

8 second read
0
0
27

no images were found

किकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ED मार्फत चौकशी करा – राजवर्धन नाईक निंबाळकर

( जिल्हा अध्यक्ष पूर्व ग्रामीण )

कोल्हापूर(प्रतिनिधी):-काही दिवसांपूर्वी किकवी येथे गोकुळने केलेल्या प्लांट खरेदीबाबत महाविकासआघाडीच्या नेत्यांनी मावळत्या सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी किंवा खरेदी चोख आहे याचा खुलासा करण्याऐवजी आमचे युतीचे संचालक काल तिसरीकडेच घसरताना दिसले. या सगळ्या गोंधळात विनाकारण अनेकांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागले. म्हणूनच कुठेतरी या गोष्टी थांबाव्यात आणि एकदा सत्य लोकांसमोर यावे म्हणून ‘किकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे आणि सखोल चौकशी एसआयटी किंवा ईडी मार्फत करावी’, अशी मागणी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्याकडे करणार आहोत.

महाविकास आघाडीचे लोक निश्चितपणे आमचे राजकीय विरोधक आहेत. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, हे काही लपून नाही. पण जर त्यांच्या मनात अश्या एखाद्या व्यवहाराबाबत शंका असतील, तर संस्थेच्या हिताचा विचार करून आणि सभासदांमध्ये संभ्रम राहू नये या भावनेतून सदर खरेदी व्यवहाराची माहिती जनतेसमोर आली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. कारण युती म्हणून आमच्या मित्रपक्षावर आरोप होत असताना पाहणं आमच्यासाठी वेदनादायक आहे. त्यामुळे आमच्या मित्रपक्षांच्या म्हणण्याप्रमाणे ‘जर खरोखरच व्यवहार चोख असेल, तर चौकशी ही धोका नसून त्यांच्या प्रामाणिकतेची पावती ठरेल’ अशी मैत्रीपूर्ण भावना आमची आहे.

त्याचबरोबर आमच्या मित्रपक्षाने कारण नसताना इतर लोकांवर जे आरोप केले आहेत. त्या आरोपात कितपत तथ्य आहे ? नेमका खर्च किती ? बचत किती ? कोणाकोणाला कधी, किती रुपये अदा केले गेले ? कोणकोणत्या व्यवहारासाठी केले गेले ? इत्यादी गोष्टींची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशीही मागणी आम्ही गोकुळ प्रशासकांकडे करणार आहोत. आरोप-प्रत्यारोप करत बसण्याऐवजी सत्य परिस्थिती लोकांसमोर यावी, इतकाच आमचा मानस आहे.

याशिवाय गायत्री कोल्ड स्टोरेजचे श्री.विजय ढेरे यांना यापूर्वी अधिकचे पैसे दिले गेले असे आमच्या मित्रपक्षाचे म्हणणे आहे, असे वाचण्यात आले. सदर श्री विजय प्रकाश ढेरे हे आमच्या त्याच मित्रपक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आहेत. या पक्षाचे 2 वेळा अधिकृत उमेदवार राहिलेले आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय प्रकाशराव ढेरे हे आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांचा राजकीय जन्म होण्यापूर्वी आणि माजी चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या जन्माच्या पण पूर्वी मा.शरद पवार साहेबांसोबत मंत्री होते. त्यामुळे त्यांच्याच पक्षाचे विजय ढेरे चुकीचे आहेत की नाही ? याचा खुलासा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी करावा, यासाठी लवकरच आम्ही त्यांचीही बारामतीमध्ये जाऊन भेट घेणार आहोत.ही भूमिका कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सहमतीने आम्ही जाहीर करत आहोत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

कलाकार शेअर करत आहेत त्या आठवणी आणि भावना ज्या रक्षाबंधनला खास बनवतात

कलाकार शेअर करत आहेत त्या आठवणी आणि भावना ज्या रक्षाबंधनला खास बनवतात मुंबई, : रक्षाबंधन ह…