Home विमा आपला सेव्हिंग्जसाठी कॉस्ट टू प्रीमियम गुणोत्तर कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाची आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफला मदत

आपला सेव्हिंग्जसाठी कॉस्ट टू प्रीमियम गुणोत्तर कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाची आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफला मदत

22 second read
0
0
10

no images were found

आपला सेव्हिंग्जसाठी कॉस्ट टू प्रीमियम गुणोत्तर कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाची आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफला मदत

मुंबई, : तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनमधील सातत्यपूर्ण गुंतवणूक तसेच खर्चात कपात करण्याच्या इतर उपाययोजनांच्या जोरावर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत आपल्या सेव्हिंग्जसाठी ‘कॉस्ट-टू-प्रीमियम’ गुणोत्तर 13.6% पर्यंत खाली आणले आहे. आपल्या व्यवसायाचा विस्तार करत असतानाही, गेल्या वर्षाच्या तुलनेत या प्रमाणात 50 बेसिस पॉइंट्सची घट झाली आहे.

     याबाबत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. गणेशन् सौंदिराम म्हणाले, “कंपनीची डिजिटल पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीमुळे केवळ ग्राहकांचे सक्षमीकरणच झाले नाही, तर पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देणेही आम्हाला शक्य झाले आहे. ग्राहक मिळवणे, वितरकांची कार्यक्षमता, सेवा प्रदान करणे आणि कामकाजाची कार्यक्षमता या गोष्टी अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही एआय (AI), ॲनालिटिक्स आणि आयसीआयसीआय प्रु पार्टनर स्टॅक, आयपीआरयू एज यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा प्रभावी वापर करत आहोत.

     जेव्हा आम्ही आमचा टेक्नॉलॉजी स्टॅक तयार केला, तेव्हा ऑटोमेशनसाठी ऑटोमेशन हे आमचे ध्येय कधीच नव्हते. तर मॅन्युअल प्रक्रियांमुळे निर्माण होणारे अडथळे आणि खर्च दूर करणे हे आमचे ध्येय होते, जेणेकरून ग्राहकांना बचतीचा अधिक कार्यक्षमतेने फायदा मिळेल आणि त्यांना एक जलद तसेच सुलभ अनुभव मिळेल. तोच विचार आता आम्हाला कार्यक्षमता सुधारण्यास मदत करत आहे.”

     पॉलिसी अर्ज ते प्रत्यक्षात जारी करण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर पुनर्विचार केल्यामुळे यापैकी बरीचशी कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत, डिजिटल KYC वापरून जारी केलेल्या सुमारे 58% पॉलिसी आणि जवळपास 54% बचत पॉलिसी त्याच दिवशी जारी करण्यात आल्या. एंड-टू-एंड डिजिटल क्लेम नोंदणीद्वारे कंपनी जलद क्लेम सहाय्य सक्षम करते, ज्याला चॅटबॉट आस्क खुशमनी, व्हॉट्सॲपद्वारे रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि AI-चलित प्री-क्लेम मूल्यांकन तसेच प्रक्रियेचा आधार आहे.

      अंडररायटिंग अर्थात जोखीम मूल्यमापनाशी निर्णयांना सहाय्य करणाऱ्या AI-आधारित मॉडेल्सचा वापर पॉलिसी टिकून राहण्याच्या अंदाजासाठी आणि दाव्यांच्या मूल्यमापनासाठीही केला जातो. यामुळे आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत विशेष चौकशीची गरज नसलेल्या वैयक्तिक दाव्यांचा निपटारा सरासरी केवळ 1 दिवसात करणे आणि 99.3% इतके या उद्योगातील आघाडीचा क्लेम सेटलमेंट रेशो गाठणे शक्य झाले आहे. दैनंदिन सेवा-सुविधांचा मोठा भाग कंपनीच्या ‘आस्क खुशमणी’ या AI-आधारित चॅटबॉटद्वारे हाताळला जातो; तर पॉलिसी नूतनीकरणाची आठवण देण्यासाठी एका बहुभाषिक व्हॉइस असिस्टंटचा वापर वाढवला जात आहे. हा व्हॉइस असिस्टंट तासाला 50,000 ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असून, भारतीय विमा क्षेत्रात अशा प्रकारची यंत्रणा राबवणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी ही एक आहे.

     वितरण व्यवस्थेचा विचार करता, कंपनीचे सल्लागार ‘IPRU Edge’ ॲडव्हायझर ॲपसारख्या साधनांचा वापर करतात. यामुळे त्यांना आपला व्यवसाय कार्यक्षमतेने वाढवणे, कामकाज व्यवस्थापित करणे, त्याच दिवशी पॉलिसी जारी करणे आणि ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देणे शक्य होते.

     ग्राहक सेवेची 25 वर्षे पूर्ण करत असताना, आगामी काळात फायदेशीर वाढ साधण्याच्या कंपनीच्या धोरणात तंत्रज्ञानावर आधारित हा दृष्टिकोन ICICI प्रुडेन्शियल लाइफच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

मातृदेवतांमध्ये संस्कृती वाटचालीच्या पाऊलखुणा: स्नेहा टोणपे

मातृदेवतांमध्ये संस्कृती वाटचालीच्या पाऊलखुणा: स्नेहा टोणपे कोल्हापूर,: मातृदेवतांमध्ये सं…