no images were found
स्वातंत्र्यदिनानिमित्त एसुसच्या लॅपटॉप्सवर तब्बल 53% पर्यंत सवलत; 16 ऑगस्टपर्यंत विशेष ऑफर्स
कोल्हापूर, : तैवानची आघाडीची तंत्रज्ञान कंपनी एसुसने स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. 16 ऑगस्टपर्यंत रिलायन्स डिजिटल, क्रोमा आणि विजय सेल्स या प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्समध्ये एसुसच्या निवडक लॅपटॉप मॉडेल्सवर तब्बल 53 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
या ऑफरमध्ये एसुसच्या आरओजी (ROG), टीयूएफ (TUF), व्हिवोबुक (Vivobook) आणि झेनबुक (Zenbook) या लोकप्रिय मालिकांतील गेमिंग, प्रीमियम आणि दैनंदिन वापरासाठीचे लॅपटॉप्स समाविष्ट आहेत. उच्च कार्यक्षमता, आधुनिक डिझाइन आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह हे लॅपटॉप ग्राहकांना आकर्षक किमतीत उपलब्ध होणार आहेत.
सवलतींसोबतच निवडक बँक कार्डांवर इन्स्टंट डिस्काउंट, 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय तसेच केवळ ₹99 पासून सुरू होणारे वॉरंटी एक्स्टेंशन प्लॅन आणि स्थानिक अपघाती नुकसान संरक्षण (Local Accidental Damage Protection) योजनांचाही लाभ ग्राहकांना मिळणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नवीन लॅपटॉप खरेदी किंवा जुना लॅपटॉप अपग्रेड करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही विशेष ऑफर फायदेशीर ठरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.