Home आरोग्य साताऱ्यातील हेल्थ सखींना विशेष प्रशिक्षण; घरपोच आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार

साताऱ्यातील हेल्थ सखींना विशेष प्रशिक्षण; घरपोच आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार

3 second read
0
0
10

no images were found

साताऱ्यातील हेल्थ सखींना विशेष प्रशिक्षण; घरपोच आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार
द्वारा हेल्थ फायनान्सच्या ११ हेल्थ सखींनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च बेंगलोर तर्फे देण्यात येणारा डिप्लोमा पूर्ण केला
सातारा  : सातारा जिल्ह्यात द्वारा हेल्थ फायनान्ससोबत कार्यरत असलेल्या ११ हेल्थ सखींनी कम्युनिटी हेल्थ अँड डिजिटल हेल्थ ऑपरेशन्स हा डिप्लोमा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. द्वारा हेल्थ फायनान्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च बेंगलोर यांनी संयुक्तपणे विकसित केलेला हा अभ्यासक्रम ग्रामीण भागात वाढत्या असंसर्गजन्य आजारांचा (NCDs) सामना करताना हेल्थ सखींना आवश्यक ज्ञान आणि कौशल्य देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनासाठी घराघरांत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याची त्यांची क्षमता वाढली आहे.

द्वारा हेल्थ फायनान्स गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून सातारा जिल्ह्यात कार्यरत असून, वडूज येथे त्यांचे कार्यालय आहे. प्रत्येक कुटुंबाने आरोग्यावर केलेला खर्च अधिक चांगले आरोग्य आणि आर्थिक परिणाम मिळवून देणारा ठरावा, विशेषतः ग्रामीण आणि वंचित कुटुंबांसाठी, या उद्देशाने ही संस्था काम करत आहे.

द्वारा हेल्थ फायनान्सच्या NEEM कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना नियमित, परवडणारी आणि सातत्यपूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाते. यामुळे उपचारासाठी लागणारा वेळ, प्रवास आणि आर्थिक भार कमी होण्यास मदत होते. हा कार्यक्रम विशेषतः प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आजारांच्या सातत्यपूर्ण व्यवस्थापनावर भर देतो.

या उपक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे हेल्थ सखी. स्थानिक महिलांमधून निवडलेल्या हेल्थ सख्या कुटुंबांना पात्र डॉक्टर आणि आरोग्यसेवांशी जोडण्याचे काम करतात. त्या घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी करतात, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करतात, डिजिटल आरोग्य नोंदी ठेवतात, आरोग्याविषयी मार्गदर्शन करतात, डॉक्टरांशी सल्लामसलत करून देतात तसेच औषधे, रेफरल आणि पुढील फॉलो-अपसाठी समन्वय साधतात.

सध्या सातारा जिल्ह्यात १,५०० हून अधिक कुटुंबे NEEM कार्यक्रमाशी जोडलेली असून, या कार्यक्रमाचा रिटेन्शन दर सुमारे ९० टक्के आहे. तसेच मधुमेह असलेल्या ५० टक्क्यांहून अधिक सदस्यांची आणि उच्च रक्तदाब असलेल्या सुमारे ६७ टक्के सदस्यांची प्रकृती नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे.

पहिल्या बॅचमधील हेल्थ सखींनी पूर्ण केलेल्या ११ महिन्यांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमात विविध प्रकारचे आरोग्य विषयक प्रशिक्षण आणि क्षेत्रीय अनुभवाचा समावेश होता. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, आरोग्य तपासण्या, डिजिटल हेल्थ टूल्स, रुग्ण सुरक्षा, मूलभूत नर्सिंग कौशल्ये, निदान प्रक्रिया, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता व सहाय्य, रुग्णांशी प्रभावी संवाद आणि आरोग्यसेवा समन्वय अशा विविध विषयांचा अभ्यासक्रमात समावेश होता.

या अभ्यासक्रमामुळे हेल्थ सखींच्या आधीपासूनच्या अनुभवाला औपचारिक वैद्यकीय आणि डिजिटल कौशल्यांची जोड मिळाली आहे. त्यामुळे त्या निश्चित कार्यपद्धतीनुसार काम करू शकतात, धोक्याची लक्षणे वेळेत ओळखू शकतात, रुग्णांच्या नोंदी अधिक अचूकपणे ठेवू शकतात आणि डॉक्टरांशी अधिक प्रभावी समन्वय साधू शकतात. यामुळे ग्रामीण भागातील घरपोच आरोग्यसेवेची गुणवत्ता आणि सातत्य आणखी मजबूत होणार आहे.

द्वारा हेल्थ फायनान्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बिंदू अनंत म्हणाल्या, “आमच्या हेल्थ सखींनी हा तांत्रिकदृष्ट्या सक्षम डिप्लोमा यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा आम्हाला अभिमान आहे. या प्रशिक्षणामुळे त्या आपल्या समुदायाला अधिक व्यापक स्वरूपात आरोग्यसेवा सहाय्य देण्यासाठी सक्षम झाल्या आहेत. हेल्थ सखींची सर्वात मोठी ताकद म्हणजे स्थानिक लोकांशी असलेली त्यांची जवळीक आणि समुदायाची सखोल समज. या डिप्लोमामुळे त्यांना क्लिनिकल आणि डिजिटल कौशल्यांची अधिक भक्कम जोड मिळाली

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

मातृदेवतांमध्ये संस्कृती वाटचालीच्या पाऊलखुणा: स्नेहा टोणपे

मातृदेवतांमध्ये संस्कृती वाटचालीच्या पाऊलखुणा: स्नेहा टोणपे कोल्हापूर,: मातृदेवतांमध्ये सं…