Home शैक्षणिक दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची प्रवेश प्रक्रियेबाबत उद्या ऑनलाइन कार्यशाळा

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची प्रवेश प्रक्रियेबाबत उद्या ऑनलाइन कार्यशाळा

23 second read
0
0
41

no images were found

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची प्रवेश प्रक्रियेबाबत उद्या ऑनलाइन कार्यशाळा

कोल्हापूर, :  शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ८९ अभ्यासकेंद्रांतील समन्वयक व लेखनिकांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्र. संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी दिली.

           बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. तसेच ऑनलाइन एम.बी.ए., एम.एस्सी. (गणित) व एम.कॉम. या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने मंगळवार, दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता या ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र. संचालक प्रा. डॉ. कृष्णा पाटील असणार आहेत.

           या कार्यशाळेस उपकुलसचिव श्री. व्ही.बी. शिंदे, सहायक कुलसचिव श्री. दिलीप मोहाडीकर, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, सातारा विभागीय समन्वयक डॉ. सूर्यकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच डॉ. प्रवीण लोंढे, डॉ. प्रसाद दावणे व श्री. संतोष देवेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

         तरी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याअंतर्गत  महाविद्यालयांमधील अभ्यासकेंद्रांचे समन्वयक व लेखनिक यांनी या ऑनलाइन कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर सौ. रूपाराणी निकम

शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर सौ. रूपाराणी निकम कोल्हापूर,&nb…