Home विमा आयसीआयसीआय लाईफची गॅरंटीड इंडेक्स्ड पेन्शन योजना सुरू, आजीवन हमी उत्पन्नाला निर्देशांकाशी जोडलेल्या वाढीच्या क्षमतेची जोड

आयसीआयसीआय लाईफची गॅरंटीड इंडेक्स्ड पेन्शन योजना सुरू, आजीवन हमी उत्पन्नाला निर्देशांकाशी जोडलेल्या वाढीच्या क्षमतेची जोड

13 second read
0
0
7

no images were found

आयसीआयसीआय लाईफची गॅरंटीड इंडेक्स्ड पेन्शन योजना सुरू, आजीवन हमी उत्पन्नाला निर्देशांकाशी जोडलेल्या वाढीच्या क्षमतेची जोड

  • आयुष्यभरासाठी निश्चित असलेले खात्रीशीर उत्पन्न1
  • निफ्टी 50 टोटल रिटर्न इंडेक्सशी (NIFTY 50 Total Return Index) जोडलेले परिवर्तनीय उत्पन्न2 (Variable income), जे ग्राहकांना बाजारपेठेत सहभागी होण्याची संधी देते आणि निवृत्तीनंतरच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण करते
  • निवृत्तीनंतरचे उत्पन्न व्यवस्थापित करण्यासाठी जॉइंट-लाईफ लाभांचे4 पर्याय, भरलेली रक्कम परत मिळण्याचा3 (Return of purchase price) पर्याय आणि इतर लवचिक सुविधांची उपलब्धता

मुंबई, : आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स लिमिटेडने आयसीआयसीआय लाईफ गॅरंटीड इंडेक्स्ड पेन्शन हे सेवानिवृत्ती उत्पन्न उत्पादन सादर केले आहे, जे ग्राहकांना गॅरंटीड अॅन्युइटी¹ आणि व्हेरिएबल अॅन्युइटी² यांचे एकत्रित फायदे देते. यातील गॅरंटीड घटक ग्राहकांना उत्पन्नाची स्थिरता देतो, तर व्हेरिएबल घटक त्यांना निर्देशांकाशी जोडलेल्या उत्पन्नाद्वारे महागाईपासून संरक्षण करण्यास मदत करतो.

या उत्पादनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 60% ते 100% पर्यंतचा गॅरंटीड अॅन्युइटी घटक निवडण्याची लवचिकता, ज्यातील उर्वरित भाग निफ्टी 50 टोटल रिटर्न इंडेक्सशी जोडलेला आहे. यामुळे ग्राहकांना बाजारात सहभागी होण्याची संधी मिळते आणि त्यांच्या उतारवयात सेवानिवृत्ती उत्पन्नात वाढीची शक्यता निर्माण होते.

या योजनेच्या शुभारंभावर भाष्य करताना, आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्सचे मुख्य उत्पादन अधिकारी, श्री. विकास गुप्ता म्हणाले, “वाढत्या आयुर्मानामुळे, व्यक्तींना दीर्घ सेवानिवृत्ती कालावधीसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. राहणीमानाचा वाढता खर्च आणि बदलणारे आर्थिक प्राधान्यक्रम यामुळे अशा सेवानिवृत्ती योजना असणे महत्त्वाचे ठरते, ज्या स्थिरता देण्यासोबतच बाजाराशी निगडित उत्पन्न वाढीची क्षमता देखील देतात.

आयसीआयसीआय लाइफ गॅरंटीड इंडेक्स्ड पेन्शनद्वारे, ग्राहक त्यांच्या सोयीनुसार हमी उत्पन्नाची पातळी निवडू शकतात, तसेच त्यांना बाजाराच्या कामगिरीचा लाभ घेण्याची संधीही मिळते. ही लवचिकता त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि अधिक आत्मविश्वासाने व आर्थिक सुरक्षिततेसह त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांचे नियोजन करण्यास सक्षम करते.”

खरेदी किमतीच्या परताव्यासह हे उत्पादन सिंगल लाइफ आणि जॉईंट लाइफ, असे पर्याय देते³. वार्षिकीधारकाचा किंवा शेवटच्या हयात वार्षिकीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, भरलेल्या एकूण प्रीमियमच्या बरोबरीचा मृत्यू लाभ नामनिर्देशित व्यक्तीला परत केला जाईल.”

‘ॲन्युइटी ॲडव्हान्स’ वैशिष्ट्याद्वारे⁵ हे उत्पादन ग्राहकांच्या तत्काळ रोखतेच्या गरजांसाठी अतिरिक्त लवचिकता देखील देते. ग्राहकांना पुढील पाच वर्षांपर्यंतच्या हमीयुक्त वार्षिकीच्या¹ ९९% पर्यंत रक्कम एकरकमी आगाऊ मिळवण्याची परवानगी हे वैशिष्ट्य देते, ज्यामुळे अत्यंत गरजेच्या वेळी तत्काळ रोखता उपलब्ध होते. ग्राहक त्यांच्या आर्थिक गरजेनुसार, वार्षिकीची रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर मिळवण्याचा पर्याय निवडू शकतात.

याव्यतिरिक्त, हे उत्पादन ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा (value-added services) देखील प्रदान करते, ज्याद्वारे त्यांना आरोग्य व्यवस्थापन आणि वेलनेस सेवांचा लाभ घेता येतो. निवृत्तीची तयारी करताना किंवा निवृत्तीनंतरच्या काळात उद्भवणाऱ्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या सेवा उपयुक्त ठरतात.

या उत्पादनाच्या लाँचसह, आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स (ICICI Life Insurance) आपल्या निवृत्तीविषयक उपाययोजनांच्या पोर्टफोलिओला अधिक बळकट करत आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक गरजांचे नियोजन करताना अधिक पर्याय आणि लवचिकता मिळते. हे उत्पादन आर्थिक नियोजनाला अधिक सुलभ करण्याच्या कंपनीच्या व्यापक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. कंपनीच्या ‘हर कल आसान’ (Har Kal Aasaan) या ब्रँड आश्वासनानुसार, हे उत्पादन ग्राहकांना अधिक आत्मविश्वासासह त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती कोल्हापूर,: – शिवाजी विद्यापीठात आज महर्षी …