Home उद्योग भागीरथी महिला संस्था आणि वस्त्रम् गारमेंटचा आदर्शवत उपक्रम

भागीरथी महिला संस्था आणि वस्त्रम् गारमेंटचा आदर्शवत उपक्रम

0 second read
0
0
11

no images were found

शिलाई व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण आणि मशिन मिळालेल्या महिलांनी उत्तम व्यवसाय करत आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकले पाऊल, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था आणि वस्त्रम् गारमेंटचा आदर्शवत उपक्रम

ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी आणि प्रगत झाल्या पाहिजेत, या हेतुने रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था आणि वस्त्रम् गारमेंटच्यावतीने महिलांना मोफत प्रशिक्षण आणि शिलाई मशिन प्रदान उपक्रम राबवण्यात येत आहे. वडणगे परिसरातील सुमारे १०० महिलांना प्रशिक्षित बनवले जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ महिलांना प्रशिक्षण देवून त्यांना वर्षभरापूर्वी शिलाई मशिन देण्यात आली आहेत. या मशिनधारक महिलांच्या स्वावलंबनाचा प्रवास जाणून घेण्यासाठी सौ. अरूंधती महाडिक यांच्यासह रोटरी सदस्यांनी लाभार्थी महिलांना भेट देवून माहिती घेतली.
रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था आणि करवीर तालुक्यातील वडणगे मधील वस्त्रम संस्थेच्यावतीने २५ महिलांना शिलाई कामाचे मोफत प्रशिक्षण देवून, त्यांना २५ शिलाई मशिन प्रदान करण्यात आली आहेत. ग्लोबल ग्राम अंतर्गत हा उपक्रम रोटरी मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या कार्यकालात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान शिलाई मशिन घेतलेल्या महिलांच्या स्वावलंबनाचा आणि प्रगतीचा प्रवास जाणून घेण्यासाठी सौ. अरूंधती महाडिक यांनी, रोटरी सदस्यांसमवेत लाभार्थी महिलांच्या घरी भेट दिली. यावेळी महिलांनी या प्रशिक्षणाचा आणि मिळालेल्या शिलाई मशिनचा आपल्या व्यवसायासाठी मोठा फायदा झाल्याचे सांगितले. शिलाई मशिनद्वारे रोजगाराचे साधन उपलब्ध झाल्याने, मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेवून, आपण भरघोस कमाई करत असल्याचे आणि त्यामुळे कुटूंबही सुखी समाधानी बनल्याचे लाभार्थी महिलांनी सांगितले. दरम्यान हा उपक्रम पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरला आहे. आता पुढील टप्प्यात २५ महिलांना या महिन्यात प्रशिक्षण आणि त्यानंतर मोफत शिलाई मशिन देणार आहे. एकूण १०० महिलांना प्रशिक्षित करून, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत, आत्मनिर्भर बनवणार असल्याचे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. या भेटी वेळी रोटरीचे राजाराम शिंपुकडे, प्रतिभा शिंपुकडे, लक्ष्मी शिरगावकर, योगिनी कुलकर्णी आणि वस्त्रम गारमेंटच्या वर्षा संकपाळ उपस्थित होत्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार १९४२’ च्या पोस्टरने वाढविली उत्सुकता

इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार १९४२’ च्या पोस्टरने वाढविली उत्सुकता क…