Home उद्योग अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसची मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये 2,500 कोटींची गुंतवणूक

अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसची मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये 2,500 कोटींची गुंतवणूक

26 second read
0
0
8

no images were found

अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसची मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये 2,500 कोटींची गुंतवणूक

दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र (मिसाइल) उत्पादन व्यवस्था उभारणार

  • या प्रकल्पात कॉम्पोझिट प्रोपेलंट आणि टीएनटी (ट्रायनायट्रोटोल्युईन) उत्पादनाची सुविधा एकाच ठिकाणी उभारली जाईल. यामुळे भारतात प्रथमच खाजगी क्षेत्रातील पूर्णपणे एकात्मिक क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता तयार होईल.
  • 2,500 कोटींच्या गुंतवणुकीमुळे सुमारे 5,000 थेट आणि अप्रत्यक्ष कुशल रोजगार निर्माण होतील. हा प्रकल्प मध्य प्रदेशला महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून अधिक बळकटी देईल.
  • या सुविधेमुळे भारताची स्वदेशी क्षेपणास्त्र निर्मिती क्षमता वाढेल आणि भारतीय सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल.
  • डीआरडीओ ने विकसित केलेल्या स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींचे यशस्वी चाचण्यांनंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची प्रक्रिया या प्रकल्पामुळे अधिक वेगाने होईल.

शिवपुरी (मध्य प्रदेश) : अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) ची संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील कंपनी अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसने आज मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे 2,500 कोटीं रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पाअंतर्गत दक्षिण आशियातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र उत्पादन व्यवस्था उभारली जाणार आहे. या प्रकल्पात एकाच ठिकाणी कंपोझिट प्रोपेलंट आणि ट्रायनायट्रोटोल्युईन (टीएनटी) उत्पादनाची अत्याधुनिक सुविधा उभारली जाईल. त्यामुळे भारतात खासगी क्षेत्रात प्रथमच मोठ्या प्रमाणावर एकात्मिक क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता विकसित होणार आहे. या गुंतवणुकीमुळे सुमारे 5,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कुशल रोजगार निर्माण होतील. तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) नव्या व्यवसायाच्या संधी मिळतील. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून अधिक मजबूत होईल.

शिवपुरी येथील हा प्रकल्प भारताच्या संरक्षण पुरवठा साखळीतील दीर्घकाळापासूनची महत्त्वाची उणीव भरून काढणार आहे. या प्रकल्पामुळे क्षेपणास्त्र प्रणालीचे एकत्रीकरण (सिस्टम इंटिग्रेशन) आणि त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या साहित्याचे उत्पादन एकाच ठिकाणी होईल. त्यामुळे भारतीय सशस्त्र दलांना स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे शक्य होईल.

या गुंतवणुकीचे स्वागत करताना मध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले, “ही महत्त्वाची गुंतवणूक मध्य प्रदेशला धोरणात्मक उत्पादन क्षेत्रासाठी पसंतीचे राज्य म्हणून अधिक बळकट करेल. यामुळे भारताची स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता मजबूत होईल. तसेच राज्यातील औद्योगिक विकासाला गती मिळून भविष्यात आणखी मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळेल.”

शिवपुरी-गुना परिसराच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री आणि गुना मतदारसंघाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, “हा प्रकल्प शिवपुरी-गुना भागासाठी औद्योगिक विकासाचे नवे पर्व सुरू करणारा आहे. राज्यात अत्याधुनिक संरक्षण उत्पादन सुविधा उभारल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दर्जेदार रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि भविष्यासाठी मजबूत औद्योगिक व्यवस्था तयार होईल.”

अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसचे डायरेक्टर जीत अदाणी म्हणाले, “आज आम्ही एका महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात करत आहोत. या प्रकल्पात प्रगत क्षेपणास्त्र प्रणालींचे एकत्रीकरण आणि त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या साहित्याचे उत्पादन एकाच ठिकाणी केले जाणार आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र उत्पादन व्यवस्था उभी राहील. ही महत्त्वाची क्षमता मध्य प्रदेशात उभारताना आम्हाला अभिमान वाटत आहे. यामुळे भारताची संरक्षण तयारी अधिक मजबूत होईल आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या उद्दिष्टाला बळ मिळेल.”

या कार्यक्रमाला अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) चे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच अदाणी सिमेंटचे डायरेक्टर करण अदाणी उपस्थित होते. मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

या प्रकल्पात अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, स्वयंचलित उत्पादन प्रणाली आणि जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्र प्रकल्पांसाठी उत्पादन करणे शक्य होईल. भारतीय सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय भागीदारांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरेल. यामुळे भारताची संरक्षण उत्पादन क्षमता आणखी मजबूत होईल आणि अचूक मार्गदर्शित शस्त्रास्त्रांचा विश्वासार्ह पुरवठादार म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होईल.

2020 पासून अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसने ग्वाल्हेर येथे आधुनिक लघु शस्त्रास्त्र उत्पादन व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात मध्य प्रदेशाचे योगदान अधिक मजबूत झाले आहे. या केंद्रातून भारतीय सशस्त्र दलांना पिस्तूल, लाईट मशीन गन, कार्बाइन, असॉल्ट रायफल तसेच इतर आधुनिक लघु शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात आहे. राज्य सरकारच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे ग्वाल्हेर येथील हा प्रकल्प भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला आहे.

भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र विकासाच्या दृष्टीने ही गुंतवणूक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर होत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस यांच्या भागीदारीत अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालींच्या यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता त्यांचे उत्पादन सुरू करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये नेक्स्ट जनरेशन अँटी-रेडिएशन मिसाइल (NGARM), रुद्रम-II, नेव्हल अँटी-शिप मिसाइल–शॉर्ट रेंज (NASM-SR), लाँग-रेंज ग्लाइड बॉम्ब (LRGB ‘गौरव’) आणि टॅक्टिकल ऑटोनॉमस रिकॉनिसन्स अँड अटॅक (TARA) प्रणाली यांचा समावेश आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

‘अदाणी कॉपर’ ग्रेड-ए कॅथोड्ससाठी मिळाली लंडन मेटल एक्स्चेंज ब्रँड नोंदणी

‘अदाणी कॉपर’ ग्रेड-ए कॅथोड्ससाठी मिळाली लंडन मेटल एक्स्चेंज ब्रँड नोंदणी अहमदाबाद,: अदाणी …