Home उद्योग एपीएसईझेड आणि एमएससी समूहाची दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत

एपीएसईझेड आणि एमएससी समूहाची दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत

14 second read
0
0
7

no images were found

एपीएसईझेड आणि एमएससी समूहाची दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत

एमएससीची टर्मिनल कंपनी TiL विजिंजम बंदरात 49% हिस्सा घेणार, एकूण कराराची किंमत 2.85 अब्ज अमेरिकी डॉलर्स.                  अहमदाबाद: भारतातील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एकात्मिक वाहतूक सेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड) आणि जगातील सर्वात मोठ्या वाहतूक व लॉजिस्टिक्स समूहांपैकी एक असलेल्या एमएससी समूहाने महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारानुसार, एमएससी समूहाची कंटेनर टर्मिनल संचालन व गुंतवणूक करणारी कंपनी टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (TiL) विजिंजम बंदराचे सवलतधारक असलेल्या एव्हीपीपीएल मध्ये 49 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करणार आहे. ही भागीदारी भारतीय बंदर पायाभूत सुविधांमधील आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी खासगी गुंतवणूक ठरणार असून, हिंद महासागर क्षेत्रातील प्रमुख ट्रान्सशिपमेंट केंद्र म्हणून विजिंजम बंदराचे स्थान अधिक मजबूत करणार आहे.

हा व्यवहार नियामक मंजुरींसह आवश्यक सर्व मंजुरी मिळाल्यानंतर पूर्ण होईल. या कराराअंतर्गत TiL कंपनी 2.85 अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याच्या एकूण व्यवहारातील आपल्या 49 टक्के हिस्स्याप्रमाणे 1.397 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

एपीएसईझेडचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अश्वनी गुप्ता म्हणाले, “विजिंजम बंदर हे आज एक प्रमुख ट्रान्सशिपमेंट हब म्हणून उदयास आले आहे. अवघ्या 18 महिन्यांच्या कार्यकाळात 20 लाख (2 दशलक्ष) टीईयू हाताळणारे भारतातील पहिले बंदर बनण्याचा मान या बंदराने मिळवला आहे.” ते पुढे म्हणाले, “विजिंजम बंदराच्या पुढील विकासासाठी आम्ही एमएससी समूहासोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत करत आहोत, याचा मला आनंद आहे. या सहकार्यामुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम होईल आणि भारताला विकसित तसेच उदयोन्मुख जागतिक बाजारपेठांपर्यंत अधिक चांगला प्रवेश मिळेल.”

एपीएसईझेड आणि एमएससी समूह यांच्यातील या धोरणात्मक भागीदारीमुळे एपीएसईझेडला अनेक महत्त्वाचे फायदे मिळणार आहेत. अतिरिक्त मालवाहतुकीमुळे बंदरावरील कार्गो हाताळणीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढेल आणि भविष्यातील मालवाहतुकीबाबत अधिक निश्चितता मिळेल. बांगलादेशातील अधिक माल विजिंजम बंदरातून हाताळला जाईल, ज्यामुळे सध्या आग्नेय आशियातील ट्रान्सशिपमेंट बंदरांवर असलेले अवलंबित्व कमी होईल. तसेच, पूर्व आफ्रिकेतील व्यापार मार्गांवर एपीएसईझेडची उपस्थिती आणखी मजबूत होईल. याशिवाय, एका जहाजातून दुसऱ्या जहाजात माल हस्तांतरित करण्यासाठी (रिले कार्गो) येणाऱ्या मालवाहतुकीचे प्रमाणही वाढेल, त्यामुळे विजिंजम बंदराचे जागतिक ट्रान्सशिपमेंट केंद्र म्हणून महत्त्व अधिक वाढेल.

टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (TiL) ही जगातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनल ऑपरेटर कंपन्यांपैकी एक असून ती एमएससी समूहाचा भाग आहे. कंपनीकडे पाच खंडांमध्ये 100 हून अधिक कंटेनर टर्मिनल्स आहेत आणि या टर्मिनल्समधून दरवर्षी 7 कोटींहून अधिक (70 दशलक्ष) टीईयू इतक्या कंटेनर मालवाहतुकीची हाताळणी केली जाते.

डिसेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या विजिंजम बंदराची क्षमता सध्या 16 लाख (1.6 दशलक्ष) टीईयू असून, हे भारतातील पहिले खोल पाण्याचे (डीप-ड्राफ्ट) मेगा ट्रान्सशिपमेंट बंदर आहे. सध्या या बंदराचा विस्तार सुरू असून, डिसेंबर 2028 पर्यंत त्याची क्षमता साडेतीन पट वाढून 57 लाख (5.7 दशलक्ष) टीईयू होणार आहे. विजिंजम बंदर युरोप, पर्शियन गल्फ आणि पूर्व आशियाला जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम (ईस्ट-वेस्ट) प्रमुख सागरी मार्गापासून सुमारे 10 नॉटिकल मैल अंतरावर असल्याने त्याला मोठे धोरणात्मक महत्त्व आहे. या बंदरात 18 ते 20 मीटर नैसर्गिक खोली, 2.9 किलोमीटरचा ब्रेकवॉटर, 800 मीटर लांबीचा बर्थ, तसेच 8 क्वे क्रेन आणि 24 पूर्णपणे स्वयंचलित यार्ड क्रेन यांसारखी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. भारतातील पहिले पूर्णपणे स्वयंचलित बंदर म्हणून विजिंजममध्ये अत्याधुनिक कंटेनर हाताळणी प्रणाली, जागतिक दर्जाचे आयटी प्लॅटफॉर्म आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्वदेशी व्हेसेल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (VTMS) कार्यरत आहे. त्यामुळे बंदरातील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह झाले आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विजिंजम बंदराने 13 लाख (1.3 दशलक्ष) टीईयू मालवाहतूक हाताळली. कार्यान्वित झाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षात बंदराने 13 लाख टीईयू मालवाहतूक आणि 615 जहाजांची हाताळणी करत 10 लाख (1 दशलक्ष) टीईयूचा टप्पा सर्वात वेगाने गाठणारे भारतातील पहिले बंदर ठरले. अवघ्या 18 महिन्यांत या बंदराने 20 लाख (2 दशलक्ष) टीईयू मालवाहतूक आणि 950 जहाजांची हाताळणी करून आणखी एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. जून 2026 मध्ये विजिंजम बंदरात 1,000 वे जहाज दाखल झाले. आतापर्यंत या बंदराने 70 हून अधिक अल्ट्रा लार्ज कंटेनर व्हेसल्स (ULCVs) हाताळली आहेत, जे भारतातील कोणत्याही बंदरापेक्षा सर्वाधिक आहे. तसेच 300 मीटरपेक्षा जास्त लांबीची 283 जहाजे आणि 16 मीटरपेक्षा अधिक ड्राफ्ट असलेली 98 जहाजे येथे हाताळण्यात आली आहेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार

१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार :डी. वाय. पाटील …