no images were found
एपीएसईझेड ने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत 19% EBITDA वाढ नोंदवली; आंतरराष्ट्रीय बंदरांचा EBITDA 256% नी वाढला
- एकत्रित महसूल 10,821 कोटी झाला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत 19% वाढ नोंदवली.
- आंतरराष्ट्रीय बंदरांनी दमदार वाढ नोंदवली, महसूल 80% वाढून 1,747 कोटी झाला, तर EBITDA 256% वाढून 730 कोटी झाला. ऑस्ट्रेलिया आणि कोलंबो येथील मजबूत कामगिरीमुळे तसेच एपीएसईझेड च्या परदेशातील व्यवसायाच्या वाढत्या विस्तारामुळे ही वाढ झाली.
- मरीन व्यवसायाचा महसूल 67% वाढून 901 कोटी झाला. ऑफशोअर जहाजांच्या ताफ्यात वाढ आणि युरोपमधील सबसी (समुद्राखालील) व्यवसायाचा विस्तार यामुळे ही वाढ झाली.
- देशांतर्गत बंदरांचा महसूल 12% वाढला. कार्गो हाताळणीतील वाढ, अधिक चांगले उत्पादन मिश्रण आणि वाढलेले उत्पन्न यामुळे ही वाढ झाली. या विभागाचा EBITDA मार्जिन 74% राहिला, जो उद्योगातील सर्वोत्तम मानला जातो.
- एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सने एपीएसईझेडचे दीर्घकालीन क्रेडिट रेटिंग “BBB-” वरून “BBB” असे वाढवले असून त्याचा दृष्टिकोन ” स्थिर” ठेवला आहे. तसेच केअर रेटिंग्सआणि आयसीआरए लिमिटेडने एपीएसईझेडचे देशांतर्गत सर्वोच्च “AAA” रेटिंग कायम ठेवले आहे.
- TNFD (निसर्गाशी संबंधित आर्थिक प्रकटीकरणावरील कार्यदल) अहवाल प्रसिद्ध करणारी भारतातील पहिली परिवहन कंपनी बनण्याचा मान एपीएसईझेड ने मिळवला आहे. यामुळे पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी कंपनीची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.
अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठी एकात्मिक परिवहन सेवा देणारी अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड’ने (एपीएसईझेड) 30 जून 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले.
अश्वनी गुप्ता, पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणाले ” आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाही मधील आमची कामगिरी आमच्या विविध व्यवसाय मॉडेलची ताकद दर्शवते. विविध देशांमध्ये, विविध प्रकारच्या मालवाहतुकीत आणि ग्राहकांमध्ये पसरलेल्या आमच्या बहुआयामी वाहतूक सुविधांमुळे आम्ही सातत्याने चांगली वाढ साध्य करत आहोत. देशांतर्गत बंदरांचा व्यवसाय मजबूत वाढ कायम ठेवत असून, तो एपीएसईझेडच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बंदरे, मरीन आणि लॉजिस्टिक्स व्यवसाय हे केवळ विस्ताराच्या टप्प्यातून पुढे जात आता महसूल आणि नफ्यात महत्त्वाची भर घालणारे व्यवसाय बनले आहेत.
सर्व व्यवसायांमध्ये होत असलेली ही संतुलित वाढ आम्हाला अॅम्बिशन 2031′ हे उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास देते. 2030 पर्यंत देशांतर्गत बंदरांची क्षमता 1,000 MMT पर्यंत वाढवण्याचा आमचा कार्यक्रम, सातत्याने वाढणारा आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वेगाने विस्तारत असलेली लॉजिस्टिक्स सेवा यांच्या बळावर एपीएसईझेड अधिक वैविध्यपूर्ण, सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक परिवहन नेटवर्क उभारत आहे. यामुळे दीर्घकालीन मूल्यनिर्मितीचा मजबूत पाया तयार होत आहे.”
आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीपासून NQXT ऑस्ट्रेलियाचे निकाल एपीएसईझेड मध्ये एकत्रित करण्यात आले.
आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाही मधील कामगिरीवरून स्पष्ट होते की एपीएसईझेड चा व्यवसाय आता केवळ पारंपरिक बंदर सेवांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बंदरे, लॉजिस्टिक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील आमचा वाढता विस्तार कंपनीसाठी उत्पन्नाचे अनेक नवे स्रोत निर्माण करत आहे. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असून, व्यवसाय अधिक मजबूत आणि स्थिर बनत आहे.
आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाही मध्ये एपीएसईझेड च्या देशांतर्गत बंदर व्यवसायाने मजबूत कामगिरी करत महसूलात 12% वाढ नोंदवली. कार्गो हाताळणी 112.9 दशलक्ष मेट्रिक टनवरून 115.3 दशलक्ष मेट्रिक टन झाली आणि EBITDA मार्जिन 74% राहिले. 30 जून 2026 रोजी कंपनीची देशांतर्गत बंदर क्षमता 653 दशलक्ष मेट्रिक टन होती, जी डिसेंबर 2030 पर्यंत 1,000 दशलक्ष मेट्रिक टन करण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील एकूण कार्गो बाजारातील एपीएसईझेड चा वाटा 27.6%, तर कंटेनर कार्गोमधील वाटा 44.8% राहिला.
आंतरराष्ट्रीय बंदर व्यवसायानेही विक्रमी कामगिरी करत आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाही मध्ये सर्वाधिक महसूल आणि EBITDA नोंदवला. कार्गो हाताळणी 7.7 दशलक्ष मेट्रिक टन वरून 22.8 दशलक्ष मेट्रिक टन झाली. ऑस्ट्रेलिया, कोलंबो, टांझानिया आणि इस्रायल येथील बंदरांच्या चांगल्या कामगिरीमुळे EBITDA मार्जिन 21.1% वरून 41.8% पर्यंत वाढले.
लॉजिस्टिक्स व्यवसायात मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे रेल्वे कंटेनर वाहतुकीवर परिणाम झाला असला, तरी ट्रकिंग महसूल 26% आणि इंटरनॅशनल फ्रेट नेटवर्क (IFN) महसूल 28% वाढला. मरीन व्यवसायानेही उत्कृष्ट कामगिरी करत महसूलात 67% वाढ नोंदवली. जहाजांची संख्या 118 वरून 135 झाली. तसेच युरोपमध्ये ओशनियरिंग इंटरनॅशनल सोबत भागीदारी आणि अर्जेंटिनातून भारतात एलएनजी निर्यातीसाठी 10 वर्षांचा महत्त्वाचा करार करून एपीएसईझेड ने आपल्या जागतिक विस्ताराला आणखी बळकटी दिली.