Home शासकीय महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील उद्यानाची स्वच्छता

महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील उद्यानाची स्वच्छता

13 second read
0
0
81

no images were found

महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील उद्यानाची स्वच्छता

कोल्हापूर  : महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन महापालिकेच्या शहरातील विविध उद्यानांची आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महापालिकेच्या 4 उद्यानामध्ये संपर्क अधिका-यांमार्फत स्वच्छता मोहिम घेण्यात आली. हि स्वच्छता मोहिम शनिवारी सकाळी 7 ते 8 या वेळेत राबविण्यात आली.

            यावेळी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी रंकाळा उद्यान येथे स्वच्छता केली. त्यांच्या सोबत अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड व पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे उपस्थित होते. तर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपशहर अभियंता सतीश फप्पे व नगरसचिव सुनिल बिद्रे यांनी टेंबालाई मंदीर परिसर, उप-आयुक्त साधना पाटील व सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील यांनी महावीर उद्यान, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव व आस्थापना अधिक्षक राम काटकर यांनी हुतात्मा पार्क याठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली. ही मोहिम 500 कर्मचाऱ्यांसह, 4 ट्रॅक्टर, 10 ॲटो टिप्परच्या सहाय्याने राबविण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…