no images were found
उर्वरित तीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे मंजुरीसाठी मी प्रयत्न करेन – हसन मुश्रीफ
कोल्हापूर : जी उर्वरीत तीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र राहिलेले आहेत त्यासाठी पालकमंत्री म्हणून ते लवकरात लवकर मंजूर करुन पुर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे. अमृत योजनेअंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या निधितून बांधण्यात आलेल्या मलनिस:रण प्रक्रिया केंद्राच्या लोकार्पण सोहळयावेळी त्यांनी सांगितले. कसबा बावडा येथील 4 द.ल.ली. क्षमतेच्या मलनिस:रण प्रक्रिया केंद्राचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी आमदार जयश्री जाधव, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, उदय गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे उपअभियंता राजेंद्र ताडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी बोलताना शहरामध्ये 123 द.ल.ली पाणी अशुध्द होते. त्यापैकी 107 द.ल.ली सांडपाण्यावर महापालिकेमार्फत प्रक्रिया होऊन ते पाणी शुध्दकरुन सोडले जाते. उर्वरीत 16 द.ल.ली सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. मी ग्रामविकास मंत्री असताना 5 हजार लोकवस्तीच्या वरील ग्रामीण भागात सांडपाणी प्रक्रिया केंद्र करण्याबाबतचे नियोजन केले होते. यासाठी 232 कोटीचा आराखडा तयार केलेला होता. परंतू काही कारणाने हा आराखडा पुर्ण होऊ शकला नाही. जोपर्यंत शहरातील व ग्रामीण भागातील सांडपाणी 100 टक्के शुध्द होणार नाही तोपर्यंत नमामी गंगा आपल्याला बघायला मिळणार नाही. शहरामध्ये मोठ-मोठया अपार्टमेंट, दवाखाने, मॉल्स होत असून नविन वाढणाऱ्या इमारतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी संबंधीत इमारत मालकांची आहे. महापालिकेच्या मार्फत 100 टक्के पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर नदीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. उर्वरित 16 द.ल.ली. साठी जे तीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र राहिलेले आहेत त्यासाठी पालकमंत्री म्हणून ते लवकरात लवकर पुर्ण घेण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे. मी पालकमंत्री होऊन 2 महिने 9 दिवस झालेले आहेत. यामध्ये मी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार घेऊन नागरीकांच्या येणाऱ्या तक्रारी निराकरण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. उप-मुख्यमंत्री अजितदादा पवार वित्त मंत्री असताना 40 कोटी तीर्थक्षेत्र आराखडयासाठी मंजूर केला होता. त्यातील चालू वर्षी 10 कोटी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. आत्ताच्या अर्थसंकल्पाच्या पुरवणीमध्ये उप-मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मी स्वत: 40 कोटीची तरतूद करुन घेतली आहे. योगायोगाने मी पालकमंत्री झाल्याबरोबर थेट पाईपलाईनचे पाणी शहराला मिळाले आहे. त्यामुळे हे शुभलक्षण आहे असे समजायला काय हरकत नाही. महापालिकेत जेंव्हा मी आढावा बैठक घेतली होती त्यावेळी शहरातील खड्डे मुजविणे, झूम प्रकल्पावरील उर्वरीत अुपर्ण कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्य शासनाचा जो निधी मंजूर आहे, जी कामे मंजूर आहेत ती तात्काळ महापालिकेने पुर्ण करुन घ्यावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.
आमदार जयश्री जाधव यांनी बोलताना केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत कसबा बावडा येथे 4 द.ल.ली. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्रामधून बापट कॅम्प नाला, बावडा, जाधववाडी, भोसलेवाडी, कदमवाडी, कपूर वसाहत, सदर बाजार, मुक्त सैनिक वसाहत, कावळा नाका, मार्केट यार्ड परिसर येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रक्रिया केलेले सांडपाण्याचा शेतीसाठी वापर करण्यात येणार असल्यामुळे पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी कमी होणार आहे. परिणामी नदीच्या प्रदूषणाची तीव्रता कमी होईल. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करणे हे आपले कर्तव्य असलेचे सांगितले.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बोलताना महापालिका शहरातील 103 द.ल.ली. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन स्वच्छ पाणी करुन सोडत आहे. आज 4 द.ल.ली.आणखीन मलनिस:रण प्रक्रिया केंद्राचा लोकार्पण सोहळा झालेने यामधून लाईन बझार, कदमवाडी, कावळा नाका या परिसरातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. आणखीन 6 द.ल.लीचे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम अंतिम टप्यात असून मार्च 2024 पर्यंत हे काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर शहरातील 113 द.ल.ली. सांडपाण्यावर प्रक्रिया होईल. अमृत 2 योजनेमधून 43 द.ल.ली. क्षमतेचे प्रक्रिया केंद्राचे तांत्रिक मान्यता झालेली आहे. राज्य शासनाकडे सदरचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे. तेही काम पुर्ण झालेस 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. शहरात 100 कोटींच्या रस्त्यांच्या कामाची निविदा 15 दिवसांपूर्वी मी मंजूरी केलेली आहे. याची वर्कऑर्डर शहर अभियंता यांच्यामार्फत दिली जाते. सदरची वर्कऑर्डर आजच देण्याचे आदेश शहर अभियंतांना मी देत आहे. झूम प्रकल्पावर दिड वर्षांपूर्वी दैनंदिन कचऱ्यावरील प्रक्रियाचे काम संबंधीत कंपनी सोडून गेल्याने महापालिकेने स्वत: कर्मचाऱ्यांमार्फत हा प्रक्रिया प्रकल्प सुरु ठेवला आहे. प्रक्रिया केंद्राच्या समोरील शेडवर पत्रे टाकणे, शेडमधील खालच्या बाजूस ट्रिमिक्स फ्लोअर करणे, लिचेड प्लॅन्टसाठीचे जे प्रस्ताव होते त्यास एक आठवडयापुर्वीच मान्यता दिलेली आहे. हे दोन्ही प्रकल्प एकत्रित सुरु झाल्यास दैनंदिन कचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया होणार आहे. त्याचबरोबर बायोमायनिंगचा प्रकल्प सुरु असून दुसऱ्या टप्यातील कामास माझी मान्यता झालेली आहे. तेही काम लवकरच सुरु होईल. शहरातील दैनंदिन स्वच्छतेचे काम महापालिकेमार्फत सुरु असून आज सकाळी मी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहिम घेतलेली आहे. थेट पाईपलाईन योजनेतून दोन पंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही ठिकाणी जुन्या लाईनवर नविन लाईनमधून पाणी देण्यासाठी क्रॉस कनेक्शन करावे लागणार आहे. या योजनेतील तीसराही पंप लवकरच सुरु होणार असून या तिन्ही पंपाद्वारे पुर्ण शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले.
अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी बोलताना पंचगंगा नदीचे प्रदूषणाबाबत प्रत्येक तीन महिन्याला जिल्हास्तरावर आढावा घेतला जातो. त्याचाच एक भाग म्हणून 4 द.ल.ली. प्रक्रिया केंद्राचा आज शुभारंभ होत आहे. शहरात आणखीन तीन नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे करावयाची आहेत. त्याचा प्रस्ताव शासन स्तराव अंतिम मंजूरी साठी आहे. त्यासाठी पालकमंत्री महोदयांनी पाठपुराव करावा अशी मी विनंती करत असल्याचे सांगितले.
यावेळी उपजल अभियंता यांत्रिकी जयेश जाधव, सहाय्यक अभियंता प्रकल्प आर के पाटील, नोबेल कंन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर अविनाश मदने, माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विनायक फाळके, राहूल चव्हाण, राजेश लाटकर आदी उपस्थित होते.