no images were found
महानगरपालिकेच्या खाद्य महोत्सवाला नागरीकांचा चांगला प्रतिसाद
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा महोत्सव महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व दिन.अ.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामार्फत ताराबाई पार्क जवळील सासने मैदान येथे रविवार, दि.17 डिसेंबर 2023 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवामध्ये महिला बचतगटांनी बनविलेल्या खाद्य पदार्थांचा 50 प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये वडा कोंबडा, बिर्याणी रस्सा, तांबडा-पांढरा रस्सा, चिकन 65, खांडोळी, नॉनव्हेज रोल, मटण लोणचे, गार्लिक चिकन, रक्तीमुंडी, सर्व प्रकारची लोणचे, आंबोळी, दावणगिरी डोसा, झुणका भाकर, वडापाव, पकोडे, व्हेजरोल, पाणी पुरी, पिझ्झा, सॅण्डविच, थालीपीठ, घरगुती बिस्किट, सर्व प्रकारचे लाडू व इतर बरेच काही पदार्थ या स्टॉलवर नागरीकांना खावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर याठिकाणी विविध प्रकारचे गेम शो ठेवण्यात आलेले आहेत. तसेच खाद्यपदार्थ खाताना गाणी गाण्याचा आनंदही नागरिकांना मिळत आहे. तसेच याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. तरी या खाद्यपदार्थाचा स्टॉलला जास्तीत जास्त नागरीकांनी भेट देऊन या खाद्य महोत्सवातील विविध पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.