no images were found
दूरशिक्षण केंद्राच्या नव्या चार अभ्यासकेंद्रांना प्रशासकीय मान्यता
कोल्हापूर : दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये यंदा चार अभ्यासकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच दोन अभ्यासकेंद्राना प्रत्येकी एक नविन अभ्यासक्रम देण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील अभ्यासकेंद्राचा समावेश आहे. या अभ्यासकेंद्रांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.
त्यामुळे सध्या अभ्यासकेंद्राची संख्या 86 इतकी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एक श्री.आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कडगाव (ता.भुदरगड), सांगली जिल्ह्यात दोन श्री.गजानन कला वाणिज्य आणि विज्ञान
महाविद्यालय, जा. बोबलाद (ता.जत) आणि श्री. संपतराव माने महाविद्यालय,खानापूर तसेच सातारा जिल्ह्यातील एक गिरीस्थान आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज महाबळेश्वर यांचा समावेश आहे.तसेच श्रीपतराव चौगुले कला व विज्ञान महाविद्यालय माळवाडी कोतोली (ता. पन्हाळा) या अभ्यास केंद्रास एम.ए.राज्यशास्त्र तर सातारा येथिल लालबहादूर शास्त्री महाविद्यालय अभ्यासकेंद्रास एम.एस्सी (गणित) हा अभ्यासक्रम नव्याने देण्यात आलेला आहे. नवीन अभ्यासकेंद्रांमध्ये त्या त्या परिसरातील विद्यार्थी, गृहिणी,कामगार यांनी प्रवेशित व्हावे असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के मोरे यांनी केले आहे.