Home राजकीय कोल्हापूरच्या महिला पत्रकारांनी संभाजी भिडे यांचा केला जाहीर निषेध

कोल्हापूरच्या महिला पत्रकारांनी संभाजी भिडे यांचा केला जाहीर निषेध

0 second read
0
0
119

no images were found

कोल्हापूरच्या महिला पत्रकारांनी संभाजी भिडे यांचा केला जाहीर निषेध
कोल्हापूर : ‘आधी टिकली लाव मग प्रश्नाचे उत्तर देतो,’ असं म्हणणाऱ्या संभाजी भिडे यांचा कोल्हापुरातील प्रसार माध्यमातील महिला पत्रकारांनी एकत्रित येत आज दसरा चौकात निषेध नोंदवला. यावेळी, टिकली लावणे हा प्रत्येक महिलेची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागावी व विधान मागे घ्यावे अशी महिला पत्रकारांनी मागणी केली.
यावेळी ‘भिडे गुरुजींचा धिक्कार असो’, ‘आधी टिकली लाव मग मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो’ असे म्हणणाऱ्या भिडे गुरुजींचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात सुनंदा मोरे, शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर, अश्विनी खोंद्रे, सीमा पवार, दीक्षा घोरपडे, अर्पणा माने, अहिल्या परकाळे, कल्याणी अमनगी, अर्चना बनगे, क्षनिक्षा धनवडे आदी महिला पत्रकार सहभागी होत्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…