Home शासकीय मतदानासाठी महाराष्ट्रातील गुजरातींना सुट्टी; राज्य सरकारचा आदेश

मतदानासाठी महाराष्ट्रातील गुजरातींना सुट्टी; राज्य सरकारचा आदेश

0 second read
0
0
85

no images were found

मतदानासाठी महाराष्ट्रातील गुजरातींना सुट्टी; राज्य सरकारचा आदेश

मुंबई : राज्य सरकारने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांमधील मतदारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांसाठी सरकारने हा आदेश जारी केला आहे.  निवडणूक गुजरातमध्ये असून सुट्टी मात्र महाराष्ट्रात अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

महाराष्ट्रात 1 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याचे  परिपत्रक जारी केलेले आहे. पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे गुजरातच्या सीमेला लागून आहेत. नोकरी, उद्योगधंद्याच्या  निमित्ताने गुजरातमधील असंख्य नागरिक महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात आलेले आहेत. त्यांची नावं गुजरातमधील मतदार यादीतच आहेत. त्यामुळे त्यांना तिथे जाऊन मतदान करता यावं, यासाठी २ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

निवडणुकीच्या काळात नोकरदारांना मतदानसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा दोन तासांची सवलतअसते. महाराष्ट्रातील निवडणुकीवेळी अशाप्रकारचा आदेश सरकारच्यावतीने देण्यात येतो. दरम्यान,  शेजारच्या राज्यातही मतदारांना मतदान करता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा आदेश काढल्याचं म्हटलं जात आहे. गुजरातमध्ये मतदार असलेल्या, पण राज्यातील या चार जिल्ह्यात काम करणाऱ्यांना मतदानासाठी ही सु्ट्टी अथवा सवलत दिली जाणार आहे. संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…