no images were found
शाहू महाराजांची छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
कोल्हापूर : जागतिक वारसा सप्ताहा निमित्त कोल्हापूर वस्तुसंग्रहालय व पुरालेखागार यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन दि.23 ते 25 नोव्हेंबर 2022 दरम्यान शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनायांतर्गत कोल्हापूर वस्तुसंग्रहालय व कोल्हापूर पुरालेखागार यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे झाले. विनामूल्य असणाऱ्या या प्रदर्शनाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दत्तक विधानासंबंधीची कागदपत्रे, त्यांच्या राज्यारोहण समारंभाची कागदपत्रे, राजर्षी शाहू महाराजांनी प्रशासन गतिमान होण्यासाठी घेतलेले निर्णय व पारित केलेले कायदे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या सुधारणा, दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, कला, क्रीडा, कृषी, उद्योग क्षेत्रामधील शाहू महाराजांचे कार्य, दुष्काळ व प्लेग काळातील त्यांचे कार्य, महत्वाचा पत्रव्यवहार असे राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.