
no images were found
महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार….
बहुमजली इमारती बांधणेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम
कोल्हापूर : महा आवास अभियान 2020-21 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेस केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार बहुमजली इमारती बांधणे यामध्ये राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे स्विकारणार आहेत, अशी माहिती प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी दिली आहे.
महाआवास अभियानमध्ये उल्लेखनीय काम केलेबद्दल राज्य स्तरावर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यासाठी गगनबावडा तालुक्यास द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार घोषित झाला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनमध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यासाठी कागल तालुका तृतीय याप्रमाणे पुरस्कार घोषित झालेली आहेत.
विशेष पुरस्कारामध्ये ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मध्ये अमित विचारे, पंचायत समिती पन्हाळा यांना पुरस्कार घोषित झालेला आहे.
केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणीमध्ये गतिमानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त राज्यात “अमृत महाअवास अभियान 2022-23” राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइट, मुंबई येथे होणार आहे.