Home संस्कृतिक आद्यगोरक्षक छत्रपती श्रीशिवाजी महाराज प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !

आद्यगोरक्षक छत्रपती श्रीशिवाजी महाराज प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !

1 second read
0
0
7

no images were found

आद्यगोरक्षक छत्रपती श्रीशिवाजी महाराज प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !

कोल्हापूर – २७ जून या दिवशी तिथीनुसार असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आद्यगोरक्षक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच विशेष प्रतिकृती सिद्ध करण्यात आली. या विशेष प्रतिकृतीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि गोरक्षक यांच्या शुभहस्ते हस्ते शिवतीर्थावर २६ जूनला मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते जीवाची पर्वा न करता गो रक्षणासाठी झटणार्‍या सर्वश्री सुचित हिरेमठ, आदित्य उपले, मनोहर इंगवले, विरेश पंडित, निलेश खरबोडे, आेंकार पाटील या गोरक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, धारकरी सर्वश्री सुमेध पोवार, आशिष पाटील, निलेश पाटील, आदित्य लाड, अनिकेत देसाई, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदुत्वनिष्ठ श्री. दिलीप भिवटे यांसह अन्य उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे लोकार्पण

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भव…