Home स्पोर्ट्स डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसा करिअरच्या अमर्याद संधी असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसा करिअरच्या अमर्याद संधी असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

1 second read
0
0
7

no images were found

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या; डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसा
करिअरच्या अमर्याद संधी असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

कोल्हापूर (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे माजी विद्यार्थी व सध्या रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ. निरांत पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून सेवा देतानाच त्यांनी भारताची आघाडीची कुस्तीगीर मीनाक्षी गोयात यांच्या फिजिओथेरपी व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे

भारतासह जगभरात प्रशिक्षित फिजिओथेरपिस्टची मागणी वाढत असून डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे अनेक माजी विद्यार्थी या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रात जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देणारा फिजिओथेरपी हा उत्तम करिअर पर्याय असून डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अमृतकुवर रायजादे यांनी सांगितले.

डॉ. निरांत हे उत्कृष्ट जलतरणपटू आणि स्पोर्ट्स फिजिओथेरपीतील मार्गदर्शक म्हणून परिचित आहेत. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले असून, इंटर युनिव्हर्सिटी स्विमिंग स्पर्धेत सलग तीन वर्षे सहभाग घेत ऑल इंडिया १८ वे स्थान मिळवले आहे.

फिजिओथेरपी पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पुरुष कुस्ती क्रमवारी स्पर्धा, महिला कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या तिरंदाजी निवड चाचण्यांमध्ये खेळाडूंना दुखापत व्यवस्थापन, सॉफ्ट टिशू ट्रीटमेंट, क्लिनिकल रिझनिंग, मॅन्युअल थेरपी व ड्राय निडलिंगसारख्या सेवा दिल्या आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणीत विनेश फोगाटवर विजय मिळवणाऱ्या मीनाक्षी गोयात यांच्या फिजिओथेरपी व्यवस्थापनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर अनेक खेळाडूंसोबत त्यांनी काम केले आहे. डॉ. निरांत पाटील यांचे यश हे डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि विद्यार्थीकेंद्री वातावरणाचे द्योतक असल्याचे डॉ. रायजादे यांनी सांगितले.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये बॅचरल ऑफ फिजिओथेरपी (बी.पीटी) आणि मास्टर ऑफ फिजिओथेरपी (एम.पीटी) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.नॅक ए++ मानांकन, क्यूएस आय-गेज डायमंड रेटिंग, एनआयआरएफ रँकिंग, आधुनिक प्रयोगशाळा, प्रगत क्लिनिकल प्रशिक्षण, संशोधन सुविधा, वसतिगृह, ग्रंथालय, क्रीडा व व्यायामशाळा यांसारख्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी डॉ. रायजादे यांनी सांगितले.

डॉ. निरांत पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील तसेच कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. अमृतकुवर रायजादे यांनी अभिनंदन केले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

तात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षम; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या तारांकित प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांचे लेखी उत्तर

तात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्ष…