no images were found
कलाकार त्यांच्या प्रवासाला आकार देणाऱ्या शिक्षक आणि मार्गदर्शकांना करतात आदरांजली
शिक्षकांचा प्रभाव वर्गखोल्यांच्या पलीकडेही पोहोचतो आणि आपलं विचार करणं, काम करणं आणि आयुष्य जगणं याला दिशा देतो. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणं, शिस्त, चिकाटी आणि दयाळूपणाचं महत्त्व सांगणं असे धडे शाळा आणि कॉलेज संपल्यानंतरही कायम आपल्यासोबत राहतात. या शिक्षक दिनानिमित्त सोनी सबचे कलाकार जितेन लालवानी, विवाना सिंग, इक्बाल खान, गुलकी जोशी, मुस्कान बामने आणि दीक्षा जोशी यांनी त्यांच्या प्रवासावर प्रभाव टाकणाऱ्या शिक्षक आणि मार्गदर्शकांची आठवण करून दिली आणि ते जीवनधडे शेअर केले जे आजही त्यांच्यासोबत आहेत.
जितेन लालवानी, जे हस्तिनापुर के वीर मध्ये गुरु द्रोणाचार्याची भूमिका साकारत आहेत, म्हणाले, “मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात मला अनेक द्रोणाचार्य लाभले आहेत. सुरुवात माझ्या वडिलांपासून झाली, ज्यांनी मला समर्पण, बांधिलकी, वेळेचं भान आणि मनापासून वेळ व प्रेम देण्याचं महत्त्व शिकवलं. माझे सासरेही माझ्या आयुष्यात उत्तम शिक्षक ठरले; त्यांनी मला सर्वांसोबत मैत्रीपूर्ण राहायला, निरीक्षक राहायला आणि आर्थिक बाबतीत अधिक सजग राहून शहाणपणाने गुंतवणूक करायला शिकवलं. व्यावसायिकदृष्ट्या मी वरिष्ठ कलाकारांसारख्या सुधीर पांडे जींकडे पाहून खूप काही शिकलो, त्यांच्या शिस्तीने आणि संयमाने माझ्यावर खोल ठसा उमटवला. आणि आज, गुरु द्रोणाचार्याची भूमिका करताना मी माझ्या आजूबाजूच्या तरुण कलाकारांकडून सतत शिकत असतो. मला खरंच वाटतं की जीवन हेच सर्वात मोठं शिक्षक आहे — जर तुम्ही खुले आणि निरीक्षक राहिलात, तर प्रत्येक व्यक्तीकडे तुम्हाला शिकवण्यासारखं काहीतरी असतं.”
विवाना सिंग, ज्या हस्तिनापुर के वीर मध्ये गांधारीची भूमिका करतात, म्हणाल्या, “माझे आई-वडील हे माझे सर्वात मोठे गुरु आहेत. त्यांनी माझं व्यक्तिमत्त्व आणि करिअर दोन्ही घडवलं. माझ्या आईने मला प्रामाणिकपणाचं महत्त्व शिकवलं. लहानपणी शाळेत मला सोन्याचं कानातलं सापडलं आणि मी ते घरी आणलं. आईने मला ते परत करायला लावलं आणि शिकवलं की योग्य गोष्ट करणं नेहमी महत्त्वाचं असतं. माझ्या वडिलांनी माझ्या करिअरला दिशा दिली अभिनय करायला प्रोत्साहन दिलं पण शिक्षण पूर्ण करायला देखील सांगितलं. त्यांच्या विश्वास, पाठिंबा आणि मूल्यांनी मला आयुष्य आणि या इंडस्ट्रीत पुढे जाण्याची ताकद दिली. वडिलांनी मला माझा मार्ग शोधायला शिकवलं आणि आईने त्या मार्गावर प्रामाणिकपणे चालायला शिकवलं.”
इक्बाल खान, जे यादें मध्ये डॉ. देवची भूमिका करतात, म्हणाले, “माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या शिक्षकांपैकी एक म्हणजे माझी थिएटर टीचर श्रीमती अरुणा आह्लुवालिया. त्यांनी अभिनयाची समज आणि त्यासोबत येणारी शिस्त मला शिकवली. त्यांच्या मुली किस्मत आह्लुवालिया, जिला आम्ही प्रेमाने ‘बिबा’ म्हणतो, हिनेही माझ्या प्रवासावर सुंदर प्रभाव टाकला आहे. मी दोघांचा खूप आभारी आहे कारण त्यांनी मला एक अभिनेता म्हणून घडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. काही शिक्षक फक्त कौशल्य शिकवत नाहीत, तर आपल्या कलेबद्दल असा दृष्टिकोन देतात जो आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो.”
मुस्कान बामने, ज्या पुष्पा इम्पॉसिबल मध्ये शनायाची भूमिका करतात, म्हणाल्या, “मी नेहमी माझ्या चाचूंना माझा सर्वात मोठा मार्गदर्शक आणि गुरु मानते. अभिनयाच्या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच ते माझ्यासाठी सल्ला देणारे होते कामाबद्दल असो किंवा आयुष्याबद्दल. त्यांनी नेहमी मला जमिनीवर राहायला, मेहनत करायला आणि यश डोक्यात जाऊ न देण्याचा सल्ला दिला. जेव्हा मी गोंधळलेली असते किंवा निर्णयाबद्दल अनिश्चित असते, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन मला गोष्टी स्पष्टपणे पाहायला मदत करतो. माझ्या प्रवासात त्यांच्या मार्गदर्शनामुळे खूप फरक पडला आहे आणि त्यांचा सल्ला माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.”
दीक्षा जोशी, ज्या पुष्पा इम्पॉसिबल मध्ये दीप्तीची भूमिका करतात, म्हणाल्या, “माझ्या आयुष्याचं तत्त्वज्ञान मी माझ्या कॉलेज प्राध्यापकांकडून शिकलं आहे. माझं विचार करणं, परिस्थिती हाताळणं आणि मी आज जी आहे ती त्यांच्या शिकवणीमुळे आहे. कॅट्रिनेल डुंका, सरवर मॅडम आणि सुसन मॅडम यांनी विशेष प्रभाव टाकला कारण त्यांनी आम्हाला फक्त उत्तरं दिली नाहीत, तर प्रश्न विचारायला, स्वतंत्रपणे विचार करायला आणि स्वतःची मतं बनवायला शिकवलं. प्रश्न विचारण्याची आणि स्वतःचा दृष्टिकोन विकसित करण्याची ही क्षमता आजही माझ्यासोबत आहे आणि मी त्यांची खूप आभारी आहे.”