Home Uncategorized के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोली

के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोली

42 second read
0
0
7

no images were found

के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोली : ३५ लॉट्ससाठी  आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे उपस्थितीत ई-ऑक्शन प्रक्रिया

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगर परिवहन उपक्रम (के.एम.टी.) कडील वापरामुळे झीज झालेले व निरुपयोगी ठरलेले विविध वाहनेविषयक साहित्य तसेच भंगार साहित्याची पारदर्शक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ई-लिलावातून रु.५२ लाख ३१ हजार ४२४ इतकी अंतिम बोली प्राप्त झाली आहे.

            के.एम.टी. उपक्रमाकडील वापरामुळे झीज झालेले टायर्स, ट्यूब्ज, स्क्रॅप बेअरिंग्ज, कमान पाटे, इंजिन पार्टस, विविध असेंब्लीज, जळके इंजिन ऑईल बॅरेल्स तसेच इतर अनुपयोगी साहित्याचे एकूण ३५ लॉट्स तयार करण्यात आले होते. या सर्व लॉट्सचा ई-लिलाव गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या मे. शंकर रामचंद्र ऑक्शनियर्स प्रा. लि., पुणे यांच्या माध्यमातून पार पडला.

            आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत  ई-ऑक्शन प्रक्रिया पार पडली. यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांच्यासह के.एम.टी.चे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            ई-लिलावाच्या अंतिम बोलीनुसार महानगरपालिकेस रु.५२ लाख ३१ हजार ४२४ रुपये इतका महसूल प्राप्त होणार आहे. या प्रक्रियेमुळे के.एम.टी.कडील दीर्घकाळापासून पडून असलेल्या निरुपयोगी व भंगार साहित्याची पारदर्शक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासोबतच महानगरपालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

            महानगरपालिकेच्या मालमत्तेची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, ई-लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता व स्पर्धात्मकता राखणे आणि उपलब्ध संसाधनांमधून अधिकाधिक महसूल मिळविणे या उद्देशाने ही ई-ऑक्शन प्रक्रिया राबविण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एपीएसईझेड मुंद्रा पोर्ट आणि एसईझेड मध्ये स्वतंत्र रिकामे कंटेनर यार्डचे कामकाज सुरू करणार

एपीएसईझेड मुंद्रा पोर्ट आणि एसईझेड मध्ये स्वतंत्र रिकामे कंटेनर यार्डचे कामकाज सुरू करणार …