no images were found
अंबुजा सिमेंट आणि लीलॅक यांची कमी-कार्बन उत्सर्जन करणाऱ्या सिमेंट उत्पादनासाठी भागीदारी
- अंबुजा सिमेंट आणि लीलॅक लिमिटेड यांनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील संघीपुरम येथे कमी-कार्बन उत्सर्जन करणाऱ्या सिमेंटच्या उत्पादनासाठी जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांपैकी एक विकसित करण्यासाठी करार केला आहे.
- या व्यावसायिक प्रात्यक्षिक प्रकल्पात लीलॅकचे कार्बन कॅप्चर आणि हायब्रिड इलेक्ट्रिफिकेशन तंत्रज्ञान तपासले जाईल. हे तंत्रज्ञान सिमेंट उत्पादनातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यास, इंधनाचा वापर घटविण्यास आणि नवीकरणीय ऊर्जेचा अधिक वापर करण्यास मदत करेल. तसेच कोळशाचा वापर शून्यावर आणण्याची आणि पर्यायी इंधनांचा लवचिक वापर करण्याची क्षमता यामध्ये आहे.
- हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याचा विस्तार 7 ते 8 पट करता येईल. त्यामुळे दरवर्षी 10 लाख टनांहून अधिक कार्बन डायऑक्साइड पकडणे शक्य होईल. यामुळे भारतासह जगभरात कमी-कार्बन सिमेंट v एक शाश्वत आणि विस्तारक्षम मार्ग उपलब्ध होऊ शकतो.
अहमदाबाद, : अदाणी समूहाची सिमेंट आणि बांधकाम साहित्य क्षेत्रातील कंपनी अंबुजा सिमेंटने कार्बन कॅप्चर आणि इलेक्ट्रिफिकेशन तंत्रज्ञान क्षेत्रातील यूकेस्थित स्वच्छ तंत्रज्ञान कंपनी लीलॅक लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी सिमेंट आणि चुनखडी उत्पादनासारख्या जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांसाठी विशेष पर्यावरणपूरक तंत्रज्ञान उपाय विकसित करते.
ही भागीदारी अंबुजा सिमेंटच्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या व्यापक धोरणातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच 2050 पर्यंत नेट-झिरो उत्सर्जन साध्य करण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाला बळकटी देते. सिमेंट उत्पादन प्रक्रियेत अधिकाधिक नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी कंपनी विद्युतीकरणाला गती देत आहे. जवळपास 1 गिगावॅट क्षमतेच्या स्वतःच्या हरित ऊर्जा प्रकल्पांच्या बळावर कंपनी कार्बन कॅप्चर सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी भक्कम पाया तयार करत आहे. याशिवाय, या सहकार्यामुळे कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानाचा खर्च कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर कार्बन कॅप्चर आणि त्याचा उपयोग करण्याचे प्रकल्प अधिक व्यवहार्य ठरतील.
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील संघीपुरम येथे असलेल्या अंबुजा सिमेंटच्या 6.6 दशलक्ष टन वार्षिक उत्पादन क्षमतेच्या (MTPA) संघी प्रकल्पात हा व्यावसायिक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पात लीलॅकचे कार्बन कॅप्चर आणि हायब्रिड इलेक्ट्रिक हीटिंग तंत्रज्ञान सिमेंट उत्पादन प्रक्रियेत कसे समाविष्ट करता येईल, याची चाचणी घेतली जाईल. या तंत्रज्ञानामुळे नवीकरणीय विजेचा अधिक वापर करून कमी उत्सर्जनासह सिमेंट उत्पादन करता येईल. तसेच उत्पादन प्रक्रियेदरम्यान अपरिहार्यपणे निर्माण होणारा कार्बन डायऑक्साइड पकडणेही शक्य होईल. हे तंत्रज्ञान कोळशाचा वापर पूर्णपणे शून्यावर आणण्याचा मार्ग तयार करू शकते, तसेच पर्यायी इंधनांचा लवचिकपणे वापर करण्याची सुविधाही देईल.
हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास, जगातील अशा प्रकारच्या सर्वात मोठ्या औद्योगिक प्रकल्पांपैकी एक म्हणून त्याचा 7 ते 8 पट विस्तार करता येईल. त्यामुळे दरवर्षी 10 लाख टनांहून अधिक कार्बन डायऑक्साइड पकडणे शक्य होईल. यामुळे भारतासह जगभरात कमी-कार्बन सिमेंट उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरता येईल असा मार्ग विकसित होण्यास मदत होईल.
करण अदाणी, डायरेक्टर, अंबुजा सिमेंट, म्हणाले, “सिमेंट उद्योगाला कमी-कार्बन उत्सर्जनाच्या भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी धाडसी विचार, तांत्रिक नवकल्पना आणि संपूर्ण मूल्यसाखळीतील सहकार्याची गरज आहे. लीलॅकसोबतची आमची भागीदारी पुढील पिढीतील तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन प्रक्रियेत होणारे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास, ऊर्जा कार्यक्षमता वाढण्यास आणि दीर्घकालीन शाश्वत विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. हा उपक्रम भविष्यासाठी जागतिक दर्जाच्या उत्पादन सुविधा उभारण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे.”
डॅनियल रेनी, सीईओ, लीलॅक लिमिटेड, म्हणाले, “अंबुजा सिमेंट हे जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक सिमेंट उत्पादन नेटवर्कपैकी एक आहे. कमी खर्चात आणि कमी कार्बन उत्सर्जनासह सिमेंट उत्पादनासाठी व्यावसायिक स्तरावरील प्रकल्प उभारण्यासाठी हे सहकार्य सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. जागतिक सिमेंट उद्योगासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे, पुन्हा वापरता येण्याजोगे आणि भविष्यासाठी उपयुक्त असे उपाय सादर करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”