no images were found
ममता बॅनर्जींच्या ‘हुकूमशाही’चा अंत-हेमंत पाटील तृणमूलच्या २० खासदारांचा एनडीएला पाठिंबा
पुणे,:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व आणि त्यांच्या विकासोन्मुख ध्येयधोरणांवरील विश्वासामुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) शक्ती वाढत आहे. देशातील ‘हिटलशाही’ तसेच ‘परिवारवादी’ संधीसाधू प्रादेशिक पक्षांचा त्यामुळे अंत होतोय, असे प्रतिपादन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.१५) केले.
तृणमूल कॉग्रेसच्या २८ पैकी तब्बल २० बंडखोर खासदारांनी धाडसी निर्णय घेत नेशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया’ (एनसीपीआय) मध्ये विलीनीकरण करत, भाजपप्रणित एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. बंडखोर गटाच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी विलीनीकरणाचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. ममता बॅनर्जींच्या ‘हिटलर’शाहीचा आणि तृणमूलमधील परिवारवादाचा हा स्पष्ट अंत आहे. कोणत्याही ठोस विचारधारेवर आधारित नसलेल्या राजकीय पक्षाची सत्ता जाताच काय गत होऊ शकते; याचे तृणमूल हे एक जिवंत उदाहरण आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
या घडामोडीमुळे केंद्रातील मोदी सरकार आता आणखी भक्कम बहुमतासह आणि नव्या उत्साहाने कार्य करेल. एनसीपीआय मध्ये विलीन झालेल्या या २० खासदारांच्या निर्णयामुळे संसदेत भाजपची ताकद वाढली असून, आगामी काळात पश्चिम बंगालच्या राजकारणात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. लवकरच होवू घातलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात या गटाला एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता देखील पाटील यांनी वर्तवली.
विशेष म्हणजे टीएमसी खासदारांच्या पाठिंब्यामुळे केंद्रातील एनडीएचे संख्याबळ आता ३०० च्या पार गेले आहे. यामुळे आगामी संसदेच्या अधिवेशनात देशाच्या हिताची आणि विकासाची महत्त्वाची घटनादुरुस्ती विधेयके कोणत्याही अडथळ्याविना मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून मोदी सरकार अधिक गतिमान होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.