Home वाढदिवस चंद्रकांतदादांवर शुभेच्छांचा वर्षाव; सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा

चंद्रकांतदादांवर शुभेच्छांचा वर्षाव; सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा

2 second read
0
0
7

no images were found

चंद्रकांतदादांवर शुभेच्छांचा वर्षाव; सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा
कोल्हापूर,(प्रतिनिधी ) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस आज कोल्हापूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम आणि शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने शहरभर रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, स्वच्छता अभियान, फुटबॉल स्पर्धा तसेच विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवारी पुण्यात वाढदिवस साजरा करून गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली.
निवासस्थानी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे, उत्तम आवाडे, सानिका आवाडे, अरुंधती महाडिक, संजय घाटगे, समरजीत राजे घाटगे,
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, संवेदना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यासाठी योगदान देण्याच्या दादांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात मोठ्या प्रमाणावर देणग्या जमा झाल्या असून त्याचा उपयोग विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांसाठी करण्यात आला.
संध्याकाळी सव्वापाच वाजता चंद्रकांतदादांचे भाजप जिल्हा मुख्यालयात आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर रूपाराणी निकम, आमदार अशोकराव माने, राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, उपमहापौर अक्षय जरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिल फरास, शिवसेना नेते सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, सरोज पाटील, डॉ. प्रताप पाटील, माजी आमदार जयंत आजगावकर, आमदार जयश्री जाधव, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, हिंदुराव पाटील, भूषण पाटील, विशाल शिराळे, रिंकू देसाई, गजानन गुरव, श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, भावेश पटेल, मनोहर निकम, रजनीताई मगदूम, कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, राजेंद्र पाटील-यड्रावकर, वृंदावन गाडगे, डॉ.आशुतोष देशपांडे, डॉ.नंदकुमार जोशी, निखिल पंडितराव, भावेश लिंबाणे, डॉ. प्रभू देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच विद्या प्रबोधिनी, खेळघर, सेवा प्रकल्प, स्वयंंसिद्धा यांसारख्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव, राहुल चिकोडे, मुरलीधर जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In वाढदिवस
Comments are closed.

Check Also

काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी घटल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा : महापालिकेचे आवाहन

काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी घटल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा : महापालिक…