no images were found
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णराज दादा महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर(प्रतिनिधी): भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर महानगरच्यावतीने भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णराज दादा महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जून २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी १० वाजता वल्लभ देसाई हे कार्यकर्ते शिये येथील एच आय व्ही मुलांना खाऊ वाटप करणार आहेत. सकाळी ११ वाजता पांजरपोळ येथे इंग्रजीत कवाळे चारा वाटप करणार आहेत.
दुपारी १२ वाजता तलहा मणेर हे सीपीआर चौक येथे जेवण वाटप करणार आहेत.दुपारी १ वाजता
हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन येथे व्यंकटेश कोटमिरे छत्री वाटप
करणार आहेत. तर सायंकाळी ५ वाजता भाजपा कार्यालय कोल्हापूर येथे कृष्णराज दादा महाडीक शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थिती असणार आहेत. आणि
सायंकाळी ७ वाजता दुध कट्टा मिरजकर तिकटी येथे नशा मुक्त भारत – दूध वाटप करण्यात येणार आहे. तरी आयोजित सर्व कार्यक्रमांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहात आणि वेळेत आणि मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विश्वजीत भरत पवार यांनी केले आहे.