Home वाढदिवस कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणजे जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; 

कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणजे जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; 

2 second read
0
0
12

no images were found

कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणजे जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; 

कोल्हापूर,(प्रतिनिधी) :  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला मिळालेली गती आणि लोकाभिमुख प्रशासनाची चर्चा सर्वत्र होत आहे.आरोग्य क्षेत्रात शासकीय रुग्णालयांच्या सुविधा अधिक सक्षम करणे, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करणे, विविध विकासकामांना गती देणे, नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये मानली जात आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून अनेक महत्त्वाच्या योजनांना मंजुरी मिळवून दिली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधत विकासकामांना वेग देण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे.जनसामान्यांशी थेट संवाद, कार्यकर्त्यांशी आत्मीय नाते आणि प्रश्न सोडविण्याची सकारात्मक भूमिका यामुळे प्रकाश आबिटकर यांनी लोकांच्या मनात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, अनेक संस्था, संघटना आणि नागरिकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून, जनसेवा आणि विकासाचा संकल्प अधिक दृढ करण्याचा दिवस असल्याची भावना व्यक्त होत आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी हाती घेतलेल्या विकासकामांना भविष्यातही अधिक वेग मिळावा आणि जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचावा, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In वाढदिवस
Comments are closed.

Check Also

आमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून 1100 एलईडी दिवे

आमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून 1100 एलईडी दिवे शहरातील बंद दिवे&n…