
no images were found
कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद मृत्यू ; हत्या की आत्महत्या
उदयपूर : जिल्ह्यातील गोगुंडा शहरात मोठी खळबळजनक घटना घडली आहे. एकाच घरातील सहा व्यक्ती मृत पावल्या आहेत. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सकाळी गावकऱ्यांनी घरात पाहिले असता चार लहान मुलं आणि एक दांपत्य मृत अवस्थेत आढळून आले. सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी गोगुंडा पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आसून मृतांचे शव ताब्यात घेतले आहे. सदर घटना ही हत्येची आहे की, आत्महत्येची या बाबत अद्याप ठोस माहिती समजू शकलेली नाही.
प्रकाश प्रजापत वय ३०, त्यांची पत्नी दुर्गाबाई वय २७ यांच्यासह ८ वर्षीय मोठा मुलगा, ५, ३ आणि २ वर्षांची लहान मुले मृत पावली आहेत, पोलिसांनी सहा व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. सदर घटना ही हत्येची आहे की, आत्महत्येची या बाबत अद्याप ठोस माहिती समजू शकलेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सोमवारी सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी दाखल झाल्यावर दरवाजा उघडताच होता. घरातील दृश्य पाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसल्याचे पोलीस म्हणाले. त्या घरात एकाच खोलीत सर्व मृत देह पडले होते. यात पती पत्नी आणि चार निष्पाप मुलं आहेत. पोलिसांनी आता या घराला सिल लावले आहे.
ही घटना आत्महत्येची असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. प्रकाश प्रजापत यांनी आधी त्यांच्या चार मुलांना गळफास दिला आणि नंतर पत्नी बरोबर स्वत: गळफास घेतला असावा अशी शक्यता व्यक्त कोली आहे. आख्ख कुटुंब एकाच वेळी संपल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक जण शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रकाश कामानिमित्त बाहेरगावी असायचा. तो नवरात्रीच्या काळातच घरी येत होता. त्यांनंतर पुन्हा तो बाहेरगावी जात होता. मात्र या वेळी नवरात्रीमध्ये घरी आल्यावर तो पुन्हा गेलाच नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. गावात त्याचे कुणाबरोबर वाद होते का? तो कोणत्या संकटात होता का? तसेच कोणत्याही अवैध कामात त्याचा सहभाग होता का? अशा विविध मुद्यांवरून पोलिसांचा शोध सुरू आहे.