no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा व्यवस्थितपणे सुरु
कोळापूर : शिवाजी विद्यापीठाच्याऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. ०२ जानेवारी, २०२३ पासून व्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत. दि.९ जानेवारी, २०२३ रोजी B.A., B.Tech, M.Sc., B.Pharm., M.A.Master of Laws, B.E., B.I.D., M.S.W., M.A.(Geography), B.Sc. M.Sc. Nanoscience & Technology, B.A. Bachelor of Education, B.Sc.(I.T.), B.A.(Dress Making & Fashion co-ordination) Bachelor of Design, B.S.W., M.A.(Mass Communication & Journalism) ,M.B.A., M.Sc.(Tech.), M.Arch. B.A. defence study, M.Arch. (General), B.B.A., M.C.A.. अशा एकूण २४अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक (offline) पध्दतीने विविध महाविद्यालये व अधिविभागामध्ये सुरळीतपणे पार पडल्या.
या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. सदर पथकाकडून परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांवर गैरप्रकार म्हणून प्रत्यक्ष नोंद करुन परीक्षा प्रमाद समितीमार्फत नियमानुसार कारवाई विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी केले आहे.