no images were found
दिलबहार तालमीचे यावर्षी 139 वर्ष असून विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू पूर्वकालीन सन 1884 सली प्रारंभ रामेश्वर प्रासादिक मंडळ या नावाने संस्थेची स्थापना झाली. यानंतर या संस्थेचे दिलबहार असे नामकरण झाले. यंदाचे दिलबहार तालीम मंडळाचे 139 वे वर्ष असून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यांमध्ये दिलबहार तालीम मंडळाची विविध अंगी यशोगाथा सूविख्यात आहेच. याच संस्थेची गौरवशाली वाटचाल समाजपयोगी संस्था म्हणून अव्याहतपणे सुरू आहे . रविवार पेठ येथील या शहराच्या केंद्रस्थानी सर्वच जातीधर्मीयांची लोकवस्ती असणाऱ्या दिलबहार संस्थेच्या वतीने सामाजिक जाण व भान जपत अनेक सामाजिक धार्मिक आणि संस्कृतिक उपक्रम वर्षभर राबविले जातात. यंदाचा गणेशोत्सव हा दिलबहार संस्थेच्या धार्मिक संस्कारातून अध्यात्मिक शांतीसाठी एक धर्मोत्सव म्हणून मोठ्या श्रद्धा व भक्तिमय वातावरणात साजरा करीत आहोत. दिलबहार संस्थेचे सर्वेसर्वा माजी महापौर मा. रामभाऊ फाळके आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय विनायक फाळके यांच्या नेतृत्वाखाली दिलबहार गणेशोत्सव 2023 सालाकरता नियुक्त केलेल्या उत्सव समितीकडून हा गणेशोत्सव मोठ्या उत्साह साजरा होत आहे. या उत्सवामध्ये रविवार पेठ तालीम परिसरातील युवक युवती, मंडळाचे कार्यकर्ते आणि अबाल वृद्ध महिलांचा सहभाग लाभत आहे .यावर्षी श्री गणेशाची मूर्ती ही दख्खनचा राजा ज्योतिबाच्या रुपात सादर केली जाणार आहे. यावेळी मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विनायक फाळके तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष जनार्दन रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष ओमकार खराडे, मेघराज पवार, खजानिस आदित्य साळुंखे , समर्थ माळी, सेक्रेटरी पवन काळगे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .याविषयीची माहिती पद्माकर चिंतामणी कापसे यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली.