no images were found
कमलाकरच्या यशाला आता नवी भरारी : दादांच्या पाठबळाने परदेशवारी
कोल्हापूर(प्रतिनिधी ): कोल्हापुरातील राजेंद्र नगर मध्ये राहणारा कमलाकर कराळे हा एक दिव्यांग खेळाडू. जन्मजात व्यंगावर मात करत कोल्हापूरच्या या सुपुत्राने ऍथलेटिक्स, पॉवर लिफ्टिंग ,व्हॉलीबॉल सीटिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत भारताचे नाव उंचावले आहे.
नुकतीच त्याची मलेशिया आणि नेपाळ इथं होणाऱ्या व्हीलचेअर क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत निवड झाली. पण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना त्याला करावा लागत होता. कमलाकरच्या महत्त्वाकांक्षेला चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठबळ दिलं.
चंद्रकांत दादा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांनी याविषयात पुढाकार घेऊन कमलाकर कराळे याला दादांकडून आर्थिक मदत मिळवून दिली. या आर्थिक मदतीचा धनादेश जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजी माने यांच्या हस्ते कमलाकर कराळे याच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी विठ्ठल पाटील, सदाशिव कुळकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.