Home सामाजिक महिलांसाठी रोजगारांची संधी उपलब्ध 

महिलांसाठी रोजगारांची संधी उपलब्ध 

2 second read
0
0
107

no images were found

महिलांसाठी रोजगारांची संधी उपलब्ध 

कोल्हापूर (प्रतिनिधी ):   प्राचीन काळी लोक आपली त्वचा सुंदर करण्यासाठी हळद, चंदन ,मुलतान माती आणि दूध वापरत असत. परंतु सध्याच्या काळात वाढत्या तंत्रज्ञानामुळे आणि जागरूकतेमुळे हे सर्व काम कॉस्मेटिक वस्तूशी संबंधित आहे .जसे की हेअर ट्रीटमेंट, आयब्रोसेप, नेल पॉलिश, फेशियल ,मेकअप आणि चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी कॉस्मेटिक इत्यादी वापरले जातात. पण पुरुषांपेक्षा महिला आणि मुलींना सजण्याची आवड फार असते. यासाठी आम्ही स्पा स्टुडिओच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये महिला आणि मुलींचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुडले हाइट्स, रेड्याची टक्कर प्रतिभानगर या ठिकाणी हेअर ड्रेसिंग ,फेशियल मॅनिक्युअर, पेडिक्युअर ,आयब्रो शेप, ब्रायडल मेकअप इत्यादी सुविधा देत आहोत .गरजू व या क्षेत्रात आवड असलेल्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही आमच्या संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील अनाथ व गरजू मुलींसाठी बेसिक ब्युटी कोर्स सुरू करत आहोत .ज्या महिला एकट्या आहेत, ज्या महिलांच्यावर घरची जबाबदारी आहे .त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही हे मोफत कोर्स देत आहोत. कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना शासनमान्य संस्थेची अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .ज्या महिलांना हा कोर्स करायचा आहे .त्यांनी श्रद्धा मोरे याना यांच्या साई स्पा स्टुडिओ अँड ब्युटी पार्लरची संपर्क साधावा ,असे आवाहन श्रद्धा मोरे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची झोपडपट्टीधारकांना ग्वाही

झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनं…