
no images were found
नूतन न्यायाधीश नियुक्त होताच कोल्हापूर सर्किट बेंचबाबत चर्चा करू – ना. चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : जिल्हा बार असोसिएशनला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे होण्यासाठी आतापर्यंत झालेल्या पाठपुराव्याचा आढावा त्यांनी घेतला. तसेच नवे सरकार सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी सकारात्मक असून नूतन न्यायाधीशांची नियुक्ती होताच त्यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी खंडपीठ कृती समितीला दिले.
जिल्हा बार असोसिएशनची अद्ययावत लायबरी व ई-लायबरीचे ना. पाटील यांनी विशेष कौतुक केले. जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅकड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते ना. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष अॅयड. संपतराव पवार, अॅयड. गिरीश नाईक, अॅनड. पी. आर. बाणावलीकर, अॅ ड. शिवाजीराव राणे यांच्यासह वकीलवर्ग उपस्थित होता.
दरम्यान, कोल्हापुरात २०११ मध्ये झालेल्या एका राजकीय आंदोलनात दगडफेक झाल्याबद्दल तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल होते. शिवसेनेच्या वतीने तत्कालीन राज्य सरकारच्या विरोधात माऊली पुतळा येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. काही आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत कॉन्स्टेबल आणि केएमटीचा चालक जखमी झाले होते. या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्यासमोर मंत्री पाटील यांचा जबाब बुधवारी नोंदविण्यात आला.