Home राजकीय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलणीकरणाला वेग येणार-हेमंत पाटील

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलणीकरणाला वेग येणार-हेमंत पाटील

0 second read
0
0
9

no images were found

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलणीकरणाला वेग येणार-हेमंत पाटील

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुप्रिया सुळेंची वर्णी लागण्याची शक्यता
सुनेत्रा वहिनींचा विक्रमी विजय अजित दादांना खरी श्रद्धांजली

पुणे,:राज्याचे लाडके नेते अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा वहिनींनी विक्रमी विजय मिळवला.या विजयानंतर दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलणीकरणाच्या चर्चेला वेग येईल, असे भाकित भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.५) वर्तवले. आगामी काळात होवू घातलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार सुप्रिया सुळे यांची त्यामुळे मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पवारांचा गट दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणानंतर एनडीए सोबत जाईल, असा दावा देखील पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे विलणीकरण झाल्यास इंडिया आघाडीत फूट पडेल. पश्चिम बंगालमधील पराभवामुळे ममता बनर्जी देखील इंडिया आघाडीपासून फारकत घेण्याची शक्यता आहे. मात्र, या विजयामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान आणखी भक्कम झाले आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून जुन्या चेहर्यांऐवजी नव्या दमातील तरूण नेतृत्वाला संधी मोदींकडून मिळण्याची शक्यता पाटील यांनी वर्तवली. पश्चिम बंगाल मधील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधानांच्या नेतृत्वात भाजपची विजयी घौडदौड सुरूच असल्याचे दिसून येतेय. अशात सुनेत्रा वहिनींच्या विजयातही भाजपचे योगदान नाकारता येणार नाही, असे पाटील म्हणाले.

बारामतीकरणांनी भरघोस मतांनी सुनेत्रा वहिनींना निवडून देत अजित दादांना खरी श्रद्धांजली दिली आहे. देशातील सगळ्यात जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा वहिनींनी त्यांच्या नावावर केला आहे. २ लाख १८ हजार ९३० मतांनी त्या विजयी झाला आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात उभे असलेले करूणा मुंडे आणि अभिजित बिचकुले यांचे जमानत जप्त झाले. सुनेत्रा वहिनींचे राज्यातील नेतृत्व या विजयानंतर आणखी भक्कम होईल, असे पाटील म्हणाले. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून राज्याच्या राजकारणाची समीकरणे आता काहीसे बदलण्याची चिन्हे असल्याचे पाटील म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना…