
no images were found
क्राइम पेट्रोल प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, वेगवान आणि वेधक गुन्हेगारी प्रकरणांचा नवीन, मर्यादित सीझन
गुन्हेगारी जगातील अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन क्राइम पेट्रोल हा लोकप्रिय शो आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे या शोची नवी आणि मर्यादित आवृत्ती! ‘क्राइम पेट्रोल 48 अवर्स’ नामक या सीझनमध्ये पोलिसांची असामान्य गुप्तचर कामगिरी आणि त्यांच्यातील जबरदस्त समन्वय यामुळे झटपट निकाली निघालेली प्रकरणे बघायला मिळतील. प्रत्येक भागात 48-तासाचा अवधी दाखवणारे घडयाळ टिकटिक करताना दिसेल, ज्यामुळे कथानक स्वाभाविकपणे जास्त वेगवान बनेल या सीझनमध्ये अशा गुन्ह्यांवर फोकस असेल, ज्यामध्ये विशेषतः पहिल्या 48 तासांमध्ये चलाख हालचाली करणे पोलिसांना गरजेचे असेल. ‘क्राइम पेट्रोल 48 अवर्स’ सुरू होत आहे 10 जुलै पासून रात्री 10:00 वाजता.
अनेक तज्ज्ञ असे सांगतात की, खुनाच्या प्रकरणात जर पहिल्या 48 तासांमध्ये तुमच्या हाती काही सुगावा लागला नाही, तर ते प्रकरण सोडविण्याची शक्यता झपाट्याने कमी होत जाते. या प्रारंभिक 48 तासांवर फोकस ठेवणारा हा सीझन आहे, ज्या काळातील कामगिरीवरून तपास दल हे प्रकरण सोडवणार की गमावणार ते नक्की होते. या सीझनमध्ये लोभ, पॅशन आणि सूड यांसह इतर विषयातून जन्मलेल्या गुन्ह्याच्या गोष्टी आहेत. अशी गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यासाठी लागणारी निष्ठा, चातुर्य आणि चिकाटी यावर या सत्रात विशेष भर देण्यात आला आहे.
कुशलपणे आणि प्रभावीपणे गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या आपल्या कायदेशीर एजन्सीजची लक्षणीय सिद्धी दाखवणारी ही मालिका आहे. या सत्रातील रहस्यमय कथा प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवतील!