Home देश-विदेश राजकारणात व व्यक्तिगत जीवनातही गुरुला वंदन करणारा मी कार्यकर्ता :- समरजित घाटगेंचा मुश्रीफांना टोला

राजकारणात व व्यक्तिगत जीवनातही गुरुला वंदन करणारा मी कार्यकर्ता :- समरजित घाटगेंचा मुश्रीफांना टोला

1 second read
0
0
35

no images were found

राजकारणात व व्यक्तिगत जीवनातही गुरुला वंदन करणारा मी कार्यकर्ता :- समरजित घाटगेंचा मुश्रीफांना टोला

कोल्हापूर :- राजकारणात व व्यक्तिगत जीवनातही गुरुला वंदन करणारा मी कार्यकर्ता आहे. माझे वडिल विक्रमसिंह घाटगे यांचे स्वर्गीय वसंतदादा पाटील व यशवंतराव मोहिते हे राजकीय गुरु होते. मोहिते यांच्यामुळेच शाहू कारखान्याला परवाना मिळाला. वडिल हेच माझे सर्वार्थाने जीवनाचे गुरु. परंतू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे राजकीय गुरु असल्याचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष समरजित घाडगे यांनी आज कागल येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

कागलच्या गैबी चौकात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. व्यासपीठावर भाजपचे चिन्ह, झेंडा कांहीच नसल्याने लोकांना सुरुवातीला कुतूहल वाटले. परंतू घाटगे यांनी गळ्यात भाजपचा कमळ चिन्ह असलेला स्कार्फ घालून हीच माझी राजकीय भूमिका असल्याचे जाहीर करताच जोरदार टाळ्या, शिट्यांचा गजर झाला.

मी पक्षाचा खुर्द कार्यकर्ता आहे अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष व कागलच्या शाहू सहकार समुहाचे नेते समरजित घाटगे यांनी गुरुवारी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली.मेळाव्यात त्यांनी मुश्रीफ यांना मला भाजपमधून बाहेर घालवायची घाई झाली असल्याची टीका केली.

काहीतरी लाभासाठी गुरु बदलणारा मी नाही. कारण आमच्या रक्तात तसे संस्कार नाहीत. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत साहेबांना सोडणार नाही असे म्हणणाऱ्यांनी आजपर्यंत किती गुरु बदलले याचा हिशोब द्यावा असे घाडगे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी स्वागत अभिनंदन करतो कारण त्यांच्यामुळे आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही माझ्या प्रचारात असतील असे सांगून त्यांनी विधानसभा निवडणूकीचे रणशिंगही फुंकले. विक्रमी मतांनी विजयी होणार असाही विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.

बदललेल्या राजकीय स्थितीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबद्दल संभ्रमात असल्याने दोन दिवस कार्यकर्त्यापासून व माध्यमापासून बाजूला राहिलो. त्याबद्दल तुम्हा सर्वांची मी माफी मागतो. कारण राजकारणात असलो तरी धांदात खोटं बोलण्याची सवय मला अजून लागलेली नाही. या दोन दिवसांत राज्यभरातील सगळ्या पक्षांच्या प्रमुखांचे फोन मला आले. ते फोन त्यांना कुणी करायला लावले ते पण माहित आहे. कारण त्यांना मला भाजपमधून लवकर बाहेर घालवायची घाई झाली आहे असा टोला घाटगे यांनी मुश्रीफ यांना लगावला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एनआयटी’ मधील एआयएमएल कोर्सच्या तुकडीत वाढ

‘एनआयटी’ मधील एआयएमएल कोर्सच्या तुकडीत वाढ   कोल्हापूर (प्रतिनिधी):-श्री …