Home Uncategorized कोल्हापूरच्या भरभराटीत आणि विकासात स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान,:खासदार धनंजय महाडिक 

कोल्हापूरच्या भरभराटीत आणि विकासात स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान,:खासदार धनंजय महाडिक 

5 second read
0
0
7

no images were found

कोल्हापूरच्या भरभराटीत आणि विकासात स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान,:खासदार धनंजय महाडिक 

कोल्हापूर (प्रतिनिधी):-सध्याच्या काळात एखादी शिक्षण संस्था काढून ती चालवणे फार कठीण काम आहे. मात्र स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांनी, प्रतिकुल परिस्थितीत अनेक संस्था सुरू करून, शिक्षणाचे रोपटे लावले. या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. डॉ. डी वाय पाटील यांनी दिलेल्या योगदानामुळे शेकडो विद्यार्थी उच्च विद्याविभुषित झाले आहेत. कोल्हापूरच्या भविष्यातील शिक्षणाची कायमस्वरूपी सोय डॉ. डी वाय पाटील यांनी करून ठेवली आहे. कोल्हापूरच्या भरभराटीत आणि विकासात डी वाय पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी डॉ. डी वाय पाटील यांच्या कार्याचे स्मरण करत, त्यांना आदरांजली वाहिली. संजय डी पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटूंबियांची खासदार महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांनी आज भेट घेवून सांत्वन केले. शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण, उद्योग यासह विविध क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवलेल्या शिक्षण महर्षी डॉ. डी वाय पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. डी वाय पाटील शिक्षण समुहाचे अध्यक्ष संजय डी पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह पाटील कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, मंत्रीगण यांच्यासह सर्वच स्तरातील नागरिकांची गेले ५ दिवस कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी रिघ लागली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांनी, पाटील कुटूंबियांची यापूर्वीच सांत्वन भेट घेतली आहे. खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांनी पाटील कुटूंबियांची आज सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत खासदार महाडिक यांनी, स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांच्याशी असलेले आपले स्नेहबंध आणि आठवणींना उजाळा दिला. शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण संस्थांचे रोपटे लावले. या रोपट्यांचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आजच्या काळातही एखादी शिक्षण संस्था सुरू करून, ती चालवणे कठीण आहे. मात्र त्या काळात डॉ. डी वाय पाटील यांनी विविध शिक्षण संस्थांची निर्मिती करून, कोल्हापुरातून शेकडो उच्च विद्याविभुषित विद्यार्थी घडवले. कोल्हापूरच्या विकासात आणि भरभराटीमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या वटवृक्षाच्या सावलीत नव्या पिढीची जडणघडण होत राहील, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. निवडणूकीत झालेल्या पराभवाने खचून जायचे नसते तर टिकून रहायचे असते. तरच यश मिळते. एक दिवस तु नक्की खासदार होशील, अशा मौलिक शब्दात डॉ. डी वाय पाटील यांनी सन २००४ मध्ये आपला आत्मविश्‍वास वाढवला होता, अशी अविस्मरणीय आठवणही खासदार महाडिक यांनी सांगितली. डॉ. डी वाय पाटील यांनी सर्वच क्षेत्रात केेलेले कार्य यापुढेही सर्व समाजाला मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरेल, असा विश्‍वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी सौ. अरूंधती महाडिक यांनीही पाटील कुटूंबियांशी संवाद साधत, त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. यावेळी महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव यांनीही, स्वर्गीय डी वाय पाटील यांना अभिवादन करून, पाटील कुटूंबियांचे सांत्वन केले. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनीही पाटील कुटूंबियाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि डॉ. डी वाय पाटील एकाच वेळी राजकारणात सक्रीय झाल्यामुळे पाटील कुटुंबियांशी आपले स्नेहाचे संबंध आहेत, अशा शब्दात नामदार देसाई यांनी डॉ. डी वाय पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन …