Home शासकीय श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा अंतर्गत प्राथमिक सर्वेक्षण करणेबाबत

श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा अंतर्गत प्राथमिक सर्वेक्षण करणेबाबत

1 second read
0
0
6

no images were found

श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा अंतर्गत प्राथमिक सर्वेक्षण करणेबाबत

कोल्हापूर, : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास महाराष्ट्र शासना कडून दिनांक ०६ मे, २०२५ रोजी मान्यता मिळालेली आहे. या मंदिर विकासाच्या प्रकल्पामुळे प्राचीन ठेवा असणाऱ्या ऐतिहासीक मदिर व त्याच्या परिसरास मुळ वैभव प्राप्त होणार आहे. त्याकरीता आराखडा परिसरातील मिळकतींचे प्राथमिक सर्वेक्षण (Primery Servey) करून सर्व आवश्यक माहिती संकलीत करणेचे काम दि.०२ मे, २०२६ पासून सुरू करणेत येणार आहे. त्या करीता तीन पथकांची नियुक्ती करणेत आलेली असून यामध्ये महसूल विभाग, महानगरपालिका, नगर भूमापन यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके मिळकतधारकांना भेटून सर्वेक्षण फॉर्म भरून घेणार आहेत. तरी सर्व मिळकतधारकांना आपली अचूक माहिती देणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
या संकलीत माहिती वरूनच परिसर विकासाची पुढील कार्यवाही करणे सुलभ होणार आहे, तरी सर्व मिळकतधारकांनी सर्व्हे करण्यास आलेल्या पथकांना सहकार्य करावे अशी विनंती प्रशासना मार्फत मोसमी चौगुले उपविभागीय अधिकारी करवीर यांनी केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

विकसित महाराष्ट्र-2047 कडे राज्याची वेगवान वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकसित महाराष्ट्र-2047 कडे राज्याची वेगवान वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प …