Home Video सिध्गीरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील: देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार

सिध्गीरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील: देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार

49 second read
0
0
22

no images were found

 

सिध्गीरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील: देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार

                                                          कोल्हापूर(प्रतिनिधी): श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दि. ३१-३-२०२६ ते ०४-०४-२०२६ या कालावधीत *’सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’* संपन्न होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सिद्धगिरी येथे संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश आवाडे, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा  शिल्पा खोत, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रियाताई शिंदे, डॉ. वर्षा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित  होते.  

       उद्घाटन प्रसंगी बोलताना नामदार पाटील पुढे म्हणाले, “ या कारागीर महाकुंभात  पारंपारिक, हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करण्यासाठी  या ठिकाणी आले आहे . या उत्सवात उच्च व तंत्र शिक्षणातील सर्व महाविद्यालयांना हा उत्सव पाहण्यासाठी आणि या उत्सवात सादरीकरण करण्यासाठी माझ्या विभागाने सूचना दिल्या आहेत. हा महाकुंभ पहायला येणारे विद्यार्थी यातून निश्चितच प्रेरणा घेऊन जातील हा मला विश्वास आहे. एक स्टार्टअपची एक संकल्पना निश्चित लोकांच्या जीवनात या महाकुंभ मुळे उतरेल. महिला वर्गाला वेळेच्या कमतरतेमुळे त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागते, त्यामुळे या कारागिरी महाकुंभाची फलनिष्पती म्हणून भविष्यात हजारो महिलांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत काही असे अभिनव कामकाज मिळेल असा मला विश्वास आहे.”

       यावेळी प्रकाश आवडे यांनी या उत्सवाला दररोज इचलकरंजी शहरातून ५०० महिलांना या कारागिरी महाकुंभासाठी आणण्याची व्यावस्था करणार असल्याचे सांगितले तर शिवसेना कोल्हापूर यांच्या वतीने हि या कार्यक्रमासाठी कोल्हापूर शहर, भुदरगड, वारणा, मुरगूड आदी ठिकाणावरून मोफत वाहतुकीची व्यवस्था करण्यात आल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. 

      भारतातील १७  राज्या-राज्यातून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अनेक कलाकार व त्यांच्या कला आणि हस्तकला या एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.  कलाकारांचे कसब आणि कौशल्य यातून कलात्मक व आकर्षक अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच या वस्तूंची विक्री हि या ठिकाणी उपलब्ध आहे. कारागीर कुंभोत्सवामध्ये अश्या विविध राज्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे आणि एकूण १७ राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय  स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० हून कलाकार ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभा’मध्ये सामील होत आहेत. टेराकोटा, मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वुड कला, बांबू काम, लेदर वर्क विविध राज्यातील एंब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला बाहुलींच्या प्रतीकात्मक ऐतिहासिक मुर्ती, स्टोन वर्क, कच्छ मधील राबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्न पासून वस्तू. मधुवेनी पेंटिंग, लाकेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या इ. हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये बघायला मिळतील.

      या कार्यक्रमात तंत्र महाविद्यालय, महाविद्यालय, पॉलीटेक्नीक, अभियांत्रिकी महाविद्यालय, आय.टी.आय. यात शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींनी या कारागीर महाकुंभात सहभाग घेतला आहे. यामध्ये संजय घोडावत विद्यापीठ, आण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय,डीकेटीई इचलकरंजी, अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालय, डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय तळसंदे , बापुजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालय,यांच्यासह विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना स्टार्टअप करिता दहा लाखाचे अर्थसहाय्य करण्याची व्यवस्था हि करण्यात आल्याचे सांगितले. 

     या सिद्धगिरी कारागिर महाकुंभ उद्घाटन सोहळ्यात प्रास्ताविक यशोवर्धन बारामतीकर यांनी तर सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालानयचे उपसंचालक भरत लांगे, शशिकांत पुजारी, शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील, राहुल चिकोडे, गुंडोपंत वद्द, विक्रम पाटील, एकत्वं इन्फ्राचे  प्रबुद्ध परदेशी  यांच्यासह नागरिक, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा महाकुंभ चार एप्रिल पर्यंत चालणार असून नागरिकांनी या कारागिर महाकुंभास भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…