Home क्राईम नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या घरी दरोडा

नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या घरी दरोडा

0 second read
0
0
213

no images were found

नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या घरी दरोडा

लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवत 70 तोळे सोन्यासह कार केली लंपास

नाशिक : ढकांबे (ता. दिंडोरी) येथे मोठ्या दरोड्याची घटना घडली. शेतकऱ्याच्या घरातून लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवत जवळपास 70 तोळे सोन्याचे दागिने तसेच चारचाकीही पळवून नेल्याची घटना घडली आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली आहे.

घरमालकाने अशी माहिती दिली की,  दरोड्यानंतर जेव्हा चोरट्यांना घरात सीसीटीव्ही असल्याचे समजले तेव्हा ते जाता – जाता सीसीटीव्हीचे हार्ड डिस्क आणि दारातली क्रेटा गाडीही चोरटे घेऊन गेले.

नाशिक शहर व परिसरात आठवड्यातील दरोड्याची ही मोठी व दुसरी घटना आहे. अवघ्या चारच दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्यात नांदुर-शिंगोटे येथून दहा ते पंधरा लाखांचा ऐवज पळविण्यात आला होता. या दोन्ही दरोड्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागात परिसरात राहणाऱ्या शेतकरी, व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर घटना नाशिक – दिंडोरी या 24 तास वर्दळ असणाऱ्या रस्त्यालगतच ढकांबे येथे घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरोड्याची माहिती मिळताच त्वरित अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दरोड्याप्रकरणी आरोपींच्या शोधार्थ तातडीने श्वानपथक पाचारण करण्यात आले परंतु कोणतही मागमूस मिळाला नाही.

सदरील शेतकरी बोडके कुटुंब झोपेत असतानाच चोरट्यांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी आतील कपाटातून दागिने काढत असताना आवाज झाल्यामुळे घरातील सर्वजण जागे होऊन त्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर दरोडेखोरांनी धारधार शस्त्रे, बंदुकीचा धाक दाखवत तसेच लहान मुलांच्या अंगावर बंदूक लावून सोने, चांदी दागिने व काही रोकड ताब्यात घेतली. दरोड्यानंतर जेव्हा चोरट्यांना घरात सीसीटीव्ही असल्याचे समजले तेव्हा ते जाता – जाता सीसीटीव्हीचे हार्ड डिस्क आणि दारातली क्रेटा गाडीही चोरटे घेऊन गेले. अशा धाडशी दरोड्याच्या घटनेमुळे पोलिस यंत्रणेसमोर शोधाचे मोठे आव्हानच उभे राहिलेले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…