Home क्राईम अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई; 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई; 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0 second read
0
0
28

no images were found

अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई; 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शनिवारी पहाटे 6.00 वाजता शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील नानी नदीपात्रात प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई केली. या कारवाई प्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सचिन मच्छिंद्र काकडे यांच्या फिर्यादीवरुन अश्पाक सुलेमान शेख ( रा. वडुले बुद्रुक ता. शेवगाव ) व गणेश चंद्रकांत केदार ( रा. लोळेगाव ता. शेवगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काकडे यांच्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना खरडगाव येथे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पहाटे 6.00 वाजता मिटके यांनी पथकासह नानी नदीपात्रात जावून पाहणी केली असता तेथे एक पिवळया रंगाचा क्रमांक नसलेल्या जेसीबीसह अश्याप सुलेमान शेख हा वाळू उपसा करताना आढळून आला. तर गणेश चंद्रकांत केदार हा विनाक्रमांकाचा एक आकाशी रंगाचा डम्परमध्ये तीन ब्रास वाळू घेऊन निघाला होता. ताबडतोब पथकाने शेख, केदार यांच्यासह 20 लाख रुपये किमतीचा जेसीबी व 6 लाख 15 हजार रुपये किमतीचा डंम्पर असा एकूण 26 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांकडून या प्रकरणी शेख व केदार यांच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक ए. एल. भाटेवाल, हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे, विलास उकीर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…