Home शासकीय नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावा

नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावा

27 second read
0
0
18

no images were found

नगररचनाघरफाळापाणीपुरवठाइस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आयुक्त केमंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावा

कोल्हापूर,(प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आज आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. ही बैठक सकाळी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांनी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, थकबाकीधारकांच्यावर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या. मोठ्या थकबाकीदार मिळकतींवर संबंधित विभागांनी तातडीने नोटिसा बजावून बोजा नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

            नगररचना विभागाने आज अखेर उर्वरित कालावधीत 100 कोटींच्या पुढे नेण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. घरफाळा विभागाने मोठ्या थकबाकीदारांशी थेट संपर्क साधून वसुली करावी, तसेच नोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. शासकीय थकबाकी असलेल्या विभागांशी पाणी पुरवठा, घरफाळा विभागाने समन्वय साधून रक्कम वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाने मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांचा पाणीपुरवठा खंडित करावा. ग्रामपंचायतींच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले. इस्टेट विभागाची वसुली कमी झाली असून थकबाकीदारांचे दुकानगाळे सील करावेत. जे गाळे रिकामे आहेत त्याची जाहिरात काढावी अशा सूचना केल्या.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाअधिकारी राजश्री पाटील, सहा-आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार एन एस पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, रचना व कार्यपद्धती अधीक्षक प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…