Home गौरव सन्मान क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूर गौरव: राज्यस्तरीय सोहळ्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचा गौरव

क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूर गौरव: राज्यस्तरीय सोहळ्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचा गौरव

3 second read
0
0
15

no images were found

क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूर गौरव: राज्यस्तरीय सोहळ्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचा गौरव

 

कोल्हापूर, : आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या परिमंडळ स्तरीय व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य  कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यात  राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर व  सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे कोल्हापूर जिल्ह्याने हे यश प्राप्त केले आहे.

या यशामध्ये सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी, सर्व जिल्हा क्षयरोग केंद्र व एन.टी.इ.पी.अधिकारी/कर्मचारी, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका ,निक्षय मित्र” (डोनर),  खासगी संस्था, एन.एम.पी.,एन. जी.ओ.यांचा सहभाग आहे.

राज्यामध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्था, अधिकारी व कर्मचारी यांचा दरवर्षी शासनामार्फत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात येतो. यावर्षी हा सोहळा 22 फेब्रुवारी रोजी यशंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट मुंबई येथे पार पडला.

या कार्यक्रमाला मुंबईचे नूतन उपमहापौर संजय घाडी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …