no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाची पटोळा साडी नेसण्याच्या राशीच्या निर्णयावरून कुटुंबात वाद-विवाद
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) आणि तिच्या समस्यांनी भरलेल्या जगाचे चित्रण बघायला मिळते. पुष्पा एक धडाडीची स्त्री आणि आई आहे जी कायद्याचा लढा, कौटुंबिक समस्या आणि स्व-शोधाचा प्रवास यांच्यात समतोल साधण्याची धडपड करत असते.
या आठवड्यात, प्रेक्षकांना एक मोठा टर्निंग पॉइंट बघायला मिळेल. राशी (अक्षया हिंदळकर) ऋषभ (श्रेय मारडिया) या आपल्या प्रियकराशी साखरपुडा करण्यास सज्ज झाली आहे. या प्रसंगी नेसण्यासाठी मधुमती (सेजल शाह) तिच्यासाठी एक सुंदर साडी पाठवते. पण राशीचे मन एका भावनिक गोष्टीकडे ओढ घेत आहे: पुष्पाची पटोळा साडी, जी पुष्पाने स्वतःच्या लग्नात नेसली होती. एक भावुक निवड करण्याचा हा क्षण पाहता पाहता मोठ्या कौटुंबिक वाद-विवादात रूपांतरित होतो, कारण मधुमती ठामपणे राशीची निवड नाकारते. पण तरीही राशी ठाम आहे. सगळ्यांचा विरोध असतानाही तिने पुष्पाची साडीच स्वतःसाठी निवडली आहे. मामला शांत करण्यासाठी ऋषभ मध्ये पडण्याचा प्रयत्न करतो आणि असे खोटे सांगतो की मधुमतीने पाठवलेली साडी फाटली होती, पण त्याच्या आईला मात्र शंका आहे की, यामागे राशीचेच डोके असणार!
राशीने भावुक होऊन घेतलेला निर्णय या महत्त्वाच्या दिवशी नव्या संघर्षाला तोंड फोडेल का?
राशीची भूमिका करणारी अक्षया हिंदळकर म्हणते, “राशीसाठी तिने पुष्पाची साडी निवडणे हे केवळ तिच्या पोशाखाबाबत नाही, तर आपल्या आईचा गौरव करण्याची आणि आपल्या जीवनाच्या नवीन अध्यायात प्रवेश करताना तिच्या शक्तीची सोबत घेण्याची ही बाब आहे. या क्षणावरून दिसून येते की राशी किती मोठी झाली आहे. संघर्ष झाला तरी, प्रेमाने ती आपली बाजू मांडायला शिकली आहे. मला वाटते, तिचे भावनिक द्वंद्व प्रेक्षक समजू शकतील.”
ऋषभची भूमिका करणारा श्रेय मारडिया म्हणतो, “ऋषभ एक असा मुलगा आहे, जो स्वतःचा खरा चेहरा पडद्याआड लपवतो आणि वर वर आपण सद्गृहस्थ असल्याचे दाखवतो. वरकरणी तो शांत आणि स्थिर वाटतो, पण आतून मात्र तो सतत पुढची चाल काय चालावी याची योजना आखत असतो. त्यामुळे त्याच्याविषयी अंदाज बांधता येत नाही आणि त्याची व्यक्तिरेखा साकारणे अधिक रोचक होते.”