Home शासकीय पणजी येथे 64 वी डाक अदालत

पणजी येथे 64 वी डाक अदालत

0 second read
0
0
56

no images were found

पणजी येथे 64 वी डाक अदालत

कोल्हापूर : पोस्टमास्तर जनरल गोवा रिजन पणजीद्वारे 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन (पणजी) यांच्या कार्यालयामध्ये 64 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.

गोवा विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. (उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.)

संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाक सेवा-1, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 1 डिसेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही, असे पोस्ट विभागाच्यवतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
0000

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…