Home स्पोर्ट्स जी. एच्.रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा महिला संघ निवड बुद्धिबळ स्पर्धेत नांदणीची संस्कृती सुतार अजिंक्य तर जयसिंगपूरची श्रेया दाइंगडे उपविजेती, शर्वरी कबनूरकर तृतीय स्थानी

जी. एच्.रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा महिला संघ निवड बुद्धिबळ स्पर्धेत नांदणीची संस्कृती सुतार अजिंक्य तर जयसिंगपूरची श्रेया दाइंगडे उपविजेती, शर्वरी कबनूरकर तृतीय स्थानी

32 second read
0
0
71

no images were found

जी. एच्.रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा महिला संघ निवड बुद्धिबळ स्पर्धेत नांदणीची संस्कृती सुतार अजिंक्य तर जयसिंगपूरची श्रेया दाइंगडे उपविजेती, शर्वरी कबनूरकर तृतीय स्थानीया#

 कोल्हापूर (प्रतिनिधी):- अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा महिला संघ निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या. जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन व कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेच्या अंतिम पाचव्या फेरीनंतर तृतीय मानांकित नांदणीच्या संस्कृती सुतारने पाच पैकी साडेचार गुण व 14 टायब्रेक गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले तर द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या श्रेया दाईंगडे ला साडेचार गुण व बारा टायब्रेक गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अग्रमानांकित कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर चार गुण मिळवून तृतीय स्थानी राहीली.. सृष्टी जोशीराव (कोल्हापूर), रेश्मा नलवडे (इचलकरंजी) व आरोही बनसोडे (कोल्हापूर) यांचा अनुक्रमे चौथा पाचवा व सहावा क्रमांक आला. उत्तेजनार्थ बक्षिसे खालील प्रमाणे:- 1) पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू तन्वी पाटील (जयसिंगपूर) 2) अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू:- हर्षदा सूर्यवंशी पाटील (कोल्हापूर) 3) नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू सांची बजाज (इचलकरंजी) 4) सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू – नक्षत्रा कांबळे (कोल्हापूर)                                                सर्व विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ आयुर्विमा महामंडळाचे माजी राष्ट्रीय बुद्धिबळपटू धनंजय इनामदार पत्रकार आशिष कदम व राजेंद्र मकोटे, विद्या घोरपडे व आशिष बजाज यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर व डेव्हलपमेंट इन्स्ट्रक्टर नमिता केसरकर उपस्थित होते.

      या निवड स्पर्धेतून खालील सहा महिलांची निवड 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान वसई येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला निवड स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.                          1) संस्कृती सुतार नांदणी 2) श्रेया दाईंगडे जयसिंगपूर 3) शर्वरी कबनूरकर कोल्हापूर 4) सृष्टी जोशीराव कोल्हापूर 5) रेश्मा नलवडे इचलकरंजी 6) आरोही बनसोडे कोल्हापूर

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…